kavya maran car collection: सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन सगळ्यांनाच माहिती असेल. वेगवेगळ्या कारणांमुळे काव्या मारन वरचे वर चर्चेत असते. क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान सोशल मीडियावर काव्याचे फोटो चर्चेत असतात. नेटिझन्स तिच्या फोटोवर अनेक कमेंट्स करत आहेत. दरम्यान, आता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिच्याजवळ असलेलं तिचं कार कलेक्शन.
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारनचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. ३३ वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याची एकूण संपत्ती ४०९ कोटी रुपये आहे. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बी.कॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. काव्याचे आजोबा एम. करुणानिधी हे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. चला तर मग सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन यांच्या कार कलेक्शनवर नजर मारुयात..
काव्या मारन यांचे कार कलेक्शन
रोल्स रॉयस
या यादीतील पहिली कार म्हणजे Rolls-Royce Phantom VIII EWB आहे. या कारचा रंग आणि डिझाइन खूपच खास आहे. ज्याची किंमत भारतात तब्बल १२.२ कोटी रुपये आहे. Rolls-Royce अनेक कस्टमायझेशन पर्याय ऑफर करते, त्यामुळे कारच्या किमतीचा अचूक आकडा लावणे कठीण आहे आणि विशेष म्हणजे नीता अंबानी यांच्याकडेही यातील एक कार आहे. रोल्स रॉयस कार निर्माता कंपनी आपल्या महागड्या व आकर्षक लूकसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. सिल्वर घोस्ट, व्रेथ आणि सिल्वर शॅडो हे काही प्रीमिअम मॉडेल्सपैकी एक आहेत. रोल्स रॉयसच्या कार सर्वाधिक महागड्या असण्याचे मोठे कारण म्हणजे बिस्पोक डिपार्टमेंट आहे, जे लक्झरी कारप्रेमींना ‘कस्टमाइजेशन’ची सुविधा देते. या सुविधेचा लाभ घेऊन कार मालकांना त्यांना पाहिजे असलेल्या सर्व सुविधा कारमध्ये उपलब्ध होण्यास मदत होत असते.
बेंटले बेंटायगा
काव्या मारन यांच्याकडे असलेली दुसरी कार म्हणजे, बेंटले बेंटायगा. ज्याची एक्स-शोरूम किंमत सहा कोटी रुपये आहे. मोठ्या व्हीलबेससह ही कार चार आणि पाच सीट लेआऊटसह आणली गेली आहे. यामध्ये मागील दोन मोठ्या सीट स्पेससह अधिक जागा देण्यात आली आहे. लांब व्हीलबेस असूनही, बेंटलेने सात सीटर पर्यायासह Bentayga EWB ऑफर केलेले नाही; हा पर्याय Bentayga मध्ये उपलब्ध असताना. याला एअरलाइन सीटसारखी लेआऊट मिळते.
BMW i7 इलेक्ट्रिक
काव्या मारन यांच्याकडे असलेली तिसरी कार म्हणजे, BMW i7 इलेक्ट्रिक सेडान. ज्याची एक्स-शोरूम किंमत २.१३ कोटी रुपये आहे. BMW i7 इलेक्ट्रिक कार ही खूप पॉवरफूल आहे.
हेही वाचा >> बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
फेरारी रोमा
काव्या मारन यांच्याकडे असलेली चौथी कार म्हणजे फेरारी रोमा. फेरारी रोमा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये २०१९ मध्येच लाँच झाली असून या कारचं नाव इटलीचं प्रसिद्ध ‘रोम’ या शहरावरून ठेवण्यात आलंय. अत्यंत आकर्षक लूक आणि पॉवरफूल इंजिन असलेल्या या शानदार कारची बेसिक एक्स-शोरुम किंमत ३.७६ कोटी रुपये आहे.