Hyundai Motors ची बहुप्रतीक्षित SUV Hyundai Tucson ही नवनिर्मिती येत्या १० ऑगस्ट रोजी भारतात लाँच केली जाणार आहे.Tucson मॉडेल १३ जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे, जी ४ ऑगस्ट रोजी लॉंच केली जाईल आणि लॉंचच्या दिवशी त्याची किंमत देखील घोषित केली जाईल. यापूर्वी ४ ऑगस्टला ही कार लाँच होणार असे सांगण्यात आले होते मात्र आता हा लाँच पुढे ढकलण्यात आला असून १० ऑगस्ट अधिकृत रित्या कार लाँच केली जाईल. ह्युंदाई ने यापूर्वीच Tucson ची प्री-बुकिंग सुरू केली होती त्यामुळे ही SUV घेण्यास इच्छुक असलेले ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा त्यांच्या जवळच्या Hyundai अधिकृत डीलरशिपला भेट देऊन ही SUV बुक करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी Tucson मध्ये Hyundai ची Sensuous Sportiness डिझाईन असेल. यात ऑल-एलईडी हेडलॅम्प्स, नवीन मॅसिव्ह-कट अलॉय व्हील, स्लोपिंग रूफलाइन आणि कनेक्टिंग बारसह ऑल-एलईडी टेललॅम्पसह पॅरामेट्रिक ग्रिल मिळेल.

ट्विन १०.२५ -इंच स्क्रीन, बोस साउंड सिस्टीम, ह्युंदाईचे स्मार्ट सेन्स टेक्नॉलॉजी, २० पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह लेव्हल-2 ADAS आणि बरेच काही या येत्या Tuscon मध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

Hyundai Tucson कंपनीने ७ कलर कॉम्बिनेशनसह सादर केली आहे. यात पाच मोनो टोन कलर स्कीम आहे, ज्यामध्ये पोल व्हाईट, फायरी रेड, फँटम व्हाईट, ग्रे आणि स्टाररी नाईट कलरचा समावेश आहे.

Hyundai Tucson च्या इंजिन साठी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय आहेत. यातील पहिले इंजिन २.० लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन १५६ bhp पॉवर आणि १९२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. दुसरे इंजिन २.० लिटर डिझेल इंजिन आहे जे १८६ Bhp पॉवर आणि ४१६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे.

Hyundai Tucson ची झलक पहा..

या पॉवरट्रेनसह कंपनीने Hyundai Tucson मध्ये ऑल व्हील ड्राईव्ह प्रणाली दिली आहे ज्यामध्ये चार ड्राइव्ह मोड एकत्र केले आहेत.पहिला मोड नॉर्मल, दुसरा इको, तिसरा स्पोर्ट आणि चौथा स्मार्ट मोड आहे. यासोबतच या एसयूव्हीमध्ये तीन टेरेन मोड देखील देण्यात आले आहेत, ज्यामध्ये पहिला मोड स्नो, दुसरा मड आणि तिसरा सँड मोड आहे.

नवीन 2022 Hyundai Tucson 10 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च होईल आणि तेव्हाच आम्हाला त्याच्या अधिकृत किमती कळतील. तूर्तास ही कार प्लॅटिनम आणि सिग्नेचर या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल अशी माहिती समोर येत आहे तसेच त्याची एक्स-शोरूम किंमत २४ लाख असावी असे अंदाज बांधण्यात येत आहे.