SUVs Will Launch in August : भारतात सुरुवातीपासून एसयुव्ही गाड्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. ग्राहक हाय ग्राउंड क्लीअरंस, फीचर्समुळे या गाड्यांना पसंत करत आहे. २०२४ मध्ये पहिल्या सहा महिन्यात बाजारात एसयुव्ही गाड्यांची ५२ टक्के भागीदारी आहे. आज आपण ऑगस्टमध्ये कोणत्या नवीन एसयुव्ही गाड्या बाजारात येणार आहे, त्या विषयी जाणून घेणार आहोत.

Citroen Basalt Coupe SUV

सिट्रोएनची Basalt Coupe SUV भारतात २ ऑगस्ट २०२४ रोजी लाँच होणार आहे. C3 Aircross वर आधारीत बेसाल्ट मध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि टेक्सचर्ड डॅशबोर्डबरोबर ही एक नवीन डिझाइन असणार आहे. मागे बसणाऱ्या ग्राहकांसाठी कपहोल्डर्स आणि फोन होल्डरबरोबर आर्मरेस्ट सारख्या एलीमेंट्सचा समावेश केला आहे.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Honda new year discount honda car offers upto 90,000 discount in January
HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : कोणती दुचाकी आहे लयभारी? फिचर्सपासून किंमतीपर्यंत; जाणून घ्या, एका क्लिकवर
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

एक कूप-स्टाइल रूफ असलेली ही गाडी १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन सह ११५ बीएचपी आणि २१५ एनएम टॉर्क निर्माण करेन. या पावरट्रेनला 6-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक टॉर्क कन्वर्टर ट्रान्समिशन असणार. १० लाखाच्या जवळपास या गाडीची किंमत असू शकते.

हेही वाचा : “सीक लिव्हसाठी ७ दिवस आधीच सांगावं लागेल” बॉस आणि कर्मचाऱ्याचे चॅट व्हायरल; अजब नियमावर कर्मचाऱ्याने दिलं जबरदस्त उत्तर

Tata Curvv EV

Tata Curvv EV ही ७ ऑगस्ट २०२४ रोजी बाजारात येणार आहे. टाटाच्या Acti.ev या प्लॅटफॉर्मवरुन या गाडीची निर्मिती केली असून ही इलेक्ट्रिक एसयुव्ही कूपची रेंज ६०० किमी आहे. यामध्ये कनेक्टेड लाइटिंग, फ्लश डोर आणि हँडल आणि इव्ही व्हेरिअंटसाठी यूनिक क्लोज्ड ग्रील आहे.

कर्व्ह इव्ही च्या इंटीरियर मध्ये १२.३ इंचची टचस्क्रीन, १०,२५ इंचीचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वेंटीलेटेड सीट्स आणि पॅनोरमिक सनरूफ सारखे फिचर्स आहेत. या आलिशान गाडीमध्ये सहा एअरबॅग, ३६० डिग्री कॅमेरा आणि लेव्हल २ ADAS सारखे सुरक्षेला घेऊन फीचर्स दिसून येईल.

Mahindra Thar ROXX

Mahindra ची बहुप्रतिक्षित गाडी Thar ROXX च्या नावाने ओळखले जाईल. कंपनी या गाडीला १५ ऑगस्ट, २०२४ रोजी लाँच करणार आहे. या गाडीमध्ये इंटीरियर स्पेस आणि एक्सेसिबिलिटी उत्तम करण्यासाठी व्हीलबेसला वाढविण्यात आले आहे. या गाडीमध्ये २.० लीटर mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन किंवा २.२ mHawk डिझेल इंजिन असू शकते ज्याला ६-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रांन्समिशन बरोबर जोडले जाईल.

Thar ROXX मध्ये दोन रंगाचे ब्लॅक-ब्राउन इंटीरियर, मोठ्या रिअर सीट्स, वाढलेला बूट स्पेस आणि मोठी टचस्क्रीन असणार आहे. प्रीमियम साउंड सिस्टम, ३६०-डिग्री कॅमेरा, ADAS आणि कीलेस एंट्री सारखे फीचर्स सुद्धा दिसून येतील. या गाडीची किंमत १६ लाख रुपयांपासून २२ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Story img Loader