सुझुकी मोटारसायकल इंडिया हा देशातील एक लोकप्रिय ब्रँड आहे. कंपनीच्या अनेक टू-व्हिलर ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामध्ये सुझुकी Access 125 चा समावेश होतो. ही स्कूटर ग्राहकांना सर्वाधिक लोकप्रिय असेलली स्कूटर आहे. आता कंपनीने हीच स्कूटर एका नवीन रंगामध्ये लॉन्च केली आहे. नवीन कलर व्हेरिएंटची स्कूटर ४ ऑगस्टपासून सुझुकीच्या दुचाकी डील्सर्सकडे उपलब्ध झाली आहे.

Suzuki Access 125: काय असणार नवीन ?

सुझुकी मोटारसायकल इंडियाने Access 125 साठी एक नवीन ड्युअल-टोन कलर व्हेरिएंट सादर केला आहे. सुझुकी Access 125 आता वीन पर्ल शायनिंग बेज / पर्ल मिराज व्हाइट कलर (new Pearl Shining Beige / Pearl Mirage White) या रंगामध्ये ८५,३०० (एक्सशोरूम) रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. हे स्पेशल एडिशन आणि कनेक्ट एडिशन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Access 125 ची टॉप-स्पेक कनेक्ट एडिशन ब्लूटूथ-सक्षम डिजिटल कंसोलसह येते. तसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल आणि एसएमएस अलर्ट इत्यादी फिचर मिळतात. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर

हेही वाचा : Two Wheeler Sales In July 2023: भारतीय बाजारात ‘या’ पाच कंपन्यांनी मारली बाजी, वाचा पूर्ण सेल्स रिपोर्ट

इंजिन आणि गिअरबॉक्स

Suzuki Access 125 मध्ये १२४ सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन मिळते. जे ८.५ बीएचपी आणि १० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन CVT सह जोडलेले आहे. ही 125cc गीअरलेस स्कूटर आता एकूण सहा प्रकारांमध्ये आणि अनेक रंगांच्या शेड्समध्ये ऑफर करण्यात आली आहे.

Suzuki Access 125 नवीन कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करताना सुझुकी मोटरसायकल इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष (सेल्स, मार्केटिंग आणि आफ्टर सेल्स) देवाशिष हांडा म्हणाले, “५ मिलियन सुझुकी Access चे उत्पादन आमच्यासाठी एक महत्वाचा क्षण आहे. Suzuki Access 125 हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर ब्रँडपैकी एक आहे. म्हणूनच आम्ही आमच्या ग्राहकांसाठी आमचे प्रमुख मॉडेल नवीन रंगात घेऊन आलो आहोत.”

Story img Loader