भारतीय बाजारात ऑल्टो गाडीची प्रचंड मागणी आहे. वाहतूक कोंडी आणि बजेटचा विचार केला तर सर्वसामान्यांना परवडणारी गाडी आहे. त्यामुळे कंपनीने ग्राहकांची मागणी पाहता नव्या ऑल्टोवर काम सुरु केलं आहे. मारुती भारतीय बाजारपेठेसाठी नवीन पिढीची ऑल्टो तयार करण्यात व्यस्त असताना, तिची मूळ कंपनी सुझुकी जपानी बाजारपेठेसाठी कारचं नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचं लॉन्चिंग जानेवारी महिन्यात होणार आहे. मात्र जापानसाठी बनवलेल्या आगामी कारचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जपानसाठी बनवलेली कार भारतीय मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. गाडीचं लॉन्चिंग होण्यापूर्वीच गाडीचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. काही दिवसांपूर्वी या कारचा फोटो इंटरनेटवर लीक झाला होता, ज्यामध्ये ही कार पूर्वीपेक्षा लांब आणि उंच असणार आहे. कार ड्युअल टोन पेंट स्कीमसह ऑफर केली जाऊ शकते. ही कार पांढरे छत आणि ORVM सह येणार आहे. आता कारचा फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर लीक झाला आहे. मात्र या गाडीबाबत अजूनही कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
लीक झालेल्या फोटोवरून असे दिसून येते की, नवीन अल्टो पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या लूकसह बाजारात उतरणार आहे. आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत, नवव्या पिढीतील सुझुकी ऑल्टोमध्ये अनेक बाह्य अपडेट्ससह असतील. दुहेरी टोन कलर स्कीमसह विरुद्ध पांढरे छत असण्याची शक्यता आहे. समोरच्या भागात जाड क्रोम लाइनसह बल्बस हेडलॅम्प, त्याच्या अगदी खाली सुझुकी बॅज आणि एक लहान ग्रिल ओपनिंग असेल. यात काही नव्या फिचर्सची भर असणार आहे. २०२२ Suzuki Alto मध्ये सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, रीस्टाईल केलेला डॅशबोर्ड, उभ्या पद्धतीने व्यवस्था केलेले नवीन एअर कंडिशनिंग व्हेंट्स, मॅन्युअल ऑपरेबल एसी, माउंटेड कंट्रोल्स असलेले स्टीयरिंग व्हील, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नव्या डिजाइन सीट्स असतील.
नवीन ऑल्टोचे खास वैशिष्ट्य म्हणजे कंपनी पूर्णपणे नवीन इंटिरियरसह लॉन्च करणार आहे. कारच्या सेंट्रल कन्सोलमध्ये लहान इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हर्टिकल स्टॅक केलेले एअर कॉन्व्हेंट्स, नवीन एसी बटणे यासारख्या अनेक नवीन गोष्टी दिसतील. नवीन अल्टो मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हीलसह येईल. ऑल्टो हॅचबॅक ही भारतातील सर्वाधिक खरेदी केलेल्या कारपैकी एक आहे. कंपनी जानेवारी 2022 मध्ये हे लीक झालेले मॉडेल जपानमध्ये लॉन्च करू शकते.