भारतीय बाजारात ऑल्टो गाडीची प्रचंड मागणी आहे. वाहतूक कोंडी आणि बजेटचा विचार केला तर सर्वसामान्यांना परवडणारी गाडी आहे. त्यामुळे कंपनीने ग्राहकांची मागणी पाहता नव्या ऑल्टोवर काम सुरु केलं आहे. मारुती भारतीय बाजारपेठेसाठी नवीन पिढीची ऑल्टो तयार करण्यात व्यस्त असताना, तिची मूळ कंपनी सुझुकी जपानी बाजारपेठेसाठी कारचं नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचं लॉन्चिंग जानेवारी महिन्यात होणार आहे. मात्र जापानसाठी बनवलेल्या आगामी कारचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जपानसाठी बनवलेली कार भारतीय मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. गाडीचं लॉन्चिंग होण्यापूर्वीच गाडीचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. काही दिवसांपूर्वी या कारचा फोटो इंटरनेटवर लीक झाला होता, ज्यामध्ये ही कार पूर्वीपेक्षा लांब आणि उंच असणार आहे. कार ड्युअल टोन पेंट स्कीमसह ऑफर केली जाऊ शकते. ही कार पांढरे छत आणि ORVM सह येणार आहे. आता कारचा फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर लीक झाला आहे. मात्र या गाडीबाबत अजूनही कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा