जापानी ऑटोमेकर सुझुकी मोटर कॉर्प आणि ‘फ्लाईंग कार’ फर्म स्कायड्राईव्ह इंक यांच्यात झालेल्या करारामुळे कारप्रेमींचं लक्ष वेधलं आहे. दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक, व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग एअरक्राफ्टच्या संशोधन, विकास आणि मार्केटिंगमध्ये एकत्र येण्यासाठी करार केला आहे. एका संयुक्त निवेदनात दोन्ही कंपन्यांनी सांगितले की, भारतावर प्रारंभिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. असं असलं तरी कंपन्यांनी त्यांच्या भागीदारीतील गुंतवणुकीचा तपशील उघड केला नाही किंवा उत्पादनाचे कोणतेही वेळापत्रक किंवा रूपरेषा दिली नाही. स्कायड्राईव्ह सध्या कॉम्पॅक्ट, दोन-आसनी इलेक्ट्रिक-पॉवर फ्लाइंग कारच्या विकासामध्ये गुंतलेली आहे. सुझुकी या विशिष्ट वाहनावर काम करेल की नाही हे स्पष्ट केलेलं नाही.
सुझुकीने जाहीर केले की, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीचे उत्पादन करण्यासाठी त्यांच्या भारतातील कारखान्यात १०४.४ अब्ज रुपये गुंतवणूक करण्याची योजना आहे. सुझुकीचा ऑटो मार्केटमध्ये अंदाजे अर्धा हिस्सा आहे. भागीदारीमध्ये चौथा मोबिलिटी व्यवसाय म्हणून ‘फ्लाईंग कार’ जोडली जाईल, असं निवेदनात म्हटले आहे. ऑटोमोबाईल्स, मोटारसायकल आणि आउटबोर्ड मोटर्स आणि आता फ्लाईंग कारचा समावेश असेल.
Yamaha Aerox 155 vs Aprilia SXR 160: स्टाईल, वेग आणि मायलेजमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या
स्कायड्राईव्ह कंपनीची जापानमधील मोठ्या व्यवसायात गणना केली जाते. ट्रेडिंग हाउस इटोचु कॉर्प, टेक फर्म NEC कॉर्प आणि एनर्जी कंपनी एनीओस होल्डिंग्स इंकचे या कंपन्यांचे मुख्य भागधारक आहे. वेबसाईटनुसार, २०२० या वर्षात कंपनीने सीरीज बी फंडांमध्ये एकूण ५.१ अब्ज येन जमा केले होते. स्कायड्राईव्ह कंपनी कार्गो ड्रोन देखील विकसित करत आहे. २०२५ मध्ये ओसाका येथे ‘फ्लाईंग कार’ सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. या वर्षी जापानी शहरात वर्ल्ड एक्स्पो आयोजित केला जातो.