गेल्या काही महिन्यात भारतीय बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींची धूम आहे. एका पाठोपाठ एक करत अनेक कंपन्या बॅटरीवर चालण्याऱ्या स्कूटर बाजारात आणत आहेत. आता सुझुकी मोटारसायकल इंडिया या कंपनीनेही कंबर कसली आहे. सुझुकी मोटरसायकल इंडियाची १८ नोव्हेंबर रोजी नवीन स्कूटर बाजारात येणार आहे. या स्कूटरचं नाव कंपनीने अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच ठेवले आहे. या स्कूटरची स्पर्धा बजाज चेतक आणि नवीन Ola S1 असेल. , कंपनीने आगामी स्कूटरच्या काही खास वैशिष्ट्यांची झलक शेअर केली आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्कूटर स्पोर्टी स्टाइलमध्ये असेल. हँडलबारमध्ये ब्लिंकर्स बसवले असतील तर समोरच्या ऍप्रनमध्ये मुख्य हेडलॅम्प असेंब्ली असेल. यासह, गडद रंगाच्या थीमवर आधारित निऑन पिवळ्या रंगाचे हायलाइट्स वापरून दुचाकीचे कोनीय डिझाइन पूर्ण केले आहे. तसेच, स्कूटरमध्ये संपूर्ण एलईडी लाइटिंग असण्याची शक्यता आहे. या
टीझरप्रमाणे स्कूटर पूर्णपणे डिजिटल डिस्प्लेने सुसज्ज असेल. डिस्प्ले स्मार्टफोनवर ब्लूटूथसह जोडला जाऊ शकतो. यामुळे दुचाकीतील अनेक कनेक्टिव्हिटी फिचर्स अनलॉक होतील. जोपर्यंत पूर्ण चार्ज रेंजचा संबंध आहे, बॅटरीवर चालणारी Suzuki स्कूटर किमान १०० किमी ते १५० किमी अंतर कापण्याची शक्यता आहे.
१८ नोव्हेंबर रोजी स्कूटरचे अधिकृत लॉन्चिंग केले जाईल. सुझुकीची स्कूटर Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर आणि TVS iQube EV चे स्पर्धक असेल. या बाब लक्षात घेऊन त्याची किंमत रु. १ लाख ते रु. १.२० लाखांच्या दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे.