Suzuki Gixxer Offers Discounts : सध्या तरुणांमध्ये दुचाकीचे प्रचंड वेड आहे. त्यामुळे भारतात विविध कंपन्या आहेत, ज्या उत्तम बाईक, मोटरसायकल, स्कूटर, स्पोर्ट्स बाईक विकत असतात. जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये नवीन बाईक घेण्याचा विचार करीत असाल, तर सुझुकी कंपनी तुमच्यासासाठी एक उत्तम ऑफर (Suzuki Gixxer Offers) घेऊन आली आहे. जपानी मोटरसायकल कंपनी सुझुकी Gixxer SF 250 आणि Gixxer 250 बाईकवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.
सुझुकी Gixxer लाइनअपच्या Gixxer 250 (naked) आणि फुल-फेअर Gixxer SF 250 बाईक पूर्वीच्या KTM 200 Duke, TVS Apache RTR 200 4V आणि Bajaj N250 यांच्याशी स्पर्धा करतात. स्पोर्टी दिसणारी Gixxer SF आणि Gixxer SF 250 खरेदी करण्यासाठी सणासुदीचा हा काळ सर्वोत्तम आहे.
काय असणार डिस्काउंट?
सुझुकी Gixxer 250 आणि Gixxer SF 250 मॉडेल्सवर ग्राहकांना चक्क २० हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक दिली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त सुझुकीच्या या दोन्ही बाइकना १० वर्षांपर्यतची वॉरंटी दिली जात आहे. या डीलमुळे सुजुकी मोटरसायकल स्वस्तात खरेदी करणे शक्य आहे. Gixxer 250 ची मार्केट रेट १,८१,४०० रुपये आहे; तर Gixxer SF 250 ची किंमत १,९२,१०० रुपये आहे.
हेही वाचा…Car Insurance : कार इन्शुरन्सअचे तुम्हाला मिळणार नाहीत पैसे; ‘या’ चुका करत असाल तर आजच टाळा
किंमत व कॅशबॅक (Suzuki Gixxer Offers) :
Suzuki Gixxer 250 | किंमत | Suzuki Gixxer SF 250 | किंमत | कॅशबॅक ऑफर्स |
स्टँडर्ड एडिशन | १,८१,४०० | स्टँडर्ड एडिशन | १,९२,००० | २० हजार रुपयांपर्यंत |
राईड कनेक्ट एडिशन | १,९८,००१ | रेस एडिशन स्टँडर्ड | १,९२,९०० | २० हजार रुपयांपर्यंत |
स्टँडर्ड राईड कनेक्ट एडिशन | २,०४,९०० | २० हजार रुपयांपर्यंत | ||
रेस एडिशन राईड कनेक्ट एडिशन | २,०५,५०१ | २० हजार रुपयांपर्यंत |
या मोटरसायकलमध्ये इंजिन ९३०० आरपीएमवर २६ पीएसची मॅक्सिमम पॉवर आणि ७३०० आरपीएमवर २२.६ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. तसेच यामध्ये ६ स्पीड ट्रान्स्मिशन गिअरबॉक्स दिले आहेत. एलईडी हेडलाइट्स, टेल लाइट्स आहेत. त्यात ब्ल्यूटूथ इंस्ट्रुमेंट कन्सोल आहे, जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह येतो. त्याद्वारे अनेक सूचना मिळतात; जसे की मिस्ड कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप मेसेज, फोनची बॅटरी, एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायव्हल (Estimated Time of Arrival), स्पीड वॉर्निंगबद्दल तुम्हाला वेळोवेळी सूचना मिळत राहतील.