आंतरराष्ट्रीय मोटारसायकल अँड एक्सेसरीज प्रदर्शनात सुझुकीने आपली नविन स्पोर्ट्स बाइक सादर केली. या स्पोर्ट्स बाइकला कटाना असं नाव देण्यात आलं आहे. कटाना स्पोर्ट्स बाइकमध्ये रंगापासून इंजिनपर्यंत आधुनिक अपडेट दिले गेले आहेत. त्यामुळे ही स्पोर्ट्स बाईस दिसायला आकर्षक आहे. यात तीन रायडिंग मोड, आरपीएम असिस्टंटसारखे चांगले फिचर्स आहेत. या नवीन सुझुकी मोटरसायकलमध्ये रायडिंग मोड सिलेक्टर सिस्टीम देण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने बाइकमध्ये तीन परफॉर्मन्स मोड निवडले जाऊ शकतात. तिन्ही मोडमध्ये तसेच पॉवर आउटपुट उपलब्ध आहे. मोड ए सर्वात जलद आणि स्पोर्टी, मोड बीमध्ये सुरळीत पॉवर आणि मोड सीमध्ये सर्वात सहज फिडबॅक मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुझुकी कटानामध्ये ९९८ सीसी इन-लाइन इंजिन देण्यात आले आहे, जे जास्तीत जास्त १५२ बीएचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इलेक्ट्रॉनिक नियंत्रित थ्रॉटलसह सुसज्ज आहे. बाईक नवीन कॅमशाफ्ट्स, नवीन व्हॉल्व्ह स्प्रिंग्स, नवीन क्लच, नवीन एक्झॉस्ट सिस्टमसह अपडेट केली जाऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स पॅकेजमध्ये सुझुकीची इझी स्टार्ट सिस्टम आणि वेग नियंत्रित करण्यासाठी आरपीएम असिस्ट आहे. यामुळे इंजिनचा वेग वाढविण्यात मदत होते.

हिरो इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत दुप्पटीने वाढ; १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान…

कटाना मोटारसायकलमध्ये लाइटवेट डबल-बीम अ‍ॅल्युमिनियम फ्रेम आणि GSX-R मधील स्विंगआर्म वापरले गेले आहेत. याला अडजेस्टेबल KYB फ्रंट फॉर्क आणि अ‍ॅडजस्टेबल डॅम्पिंग रिअर शॉक मिळतो. तसेच, मोटारसायकलला ब्रेम्बो मोनोब्लॉक कॅलिपर्स ३१० मिमी फ्रंट डिस्कशी जोडलेले आहेत. अ‍ॅल्युमिनियमच्या चाकांना ६ स्पोक आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suzuki introduces katana sports bike in exhibition rmt