सुझुकी एक ऑटो कंपनी आहे. ही नवनवीन वाहनांचे उत्पादन करत असते. जपानी ऑटोमेकर सुझुकी मोटर कार्पोरेशन पूर्णपणे इलेक्ट्रिक जिमनी ऑफ-रोडर SUV विकसित करत आहे. ऑटोमेकरने काही काळ आधीच कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी जागतिक उत्पादन धोरण जाहीर केले आहे. ज्यात BEV (बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल), HEV (हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल) आणि ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) मॉडेल्स तसेच इथेनॉल, CNG, बायोगॅसवर चालणारे मॉडेल्सचा समावेश आहे. ही सर्व वाहने २०३० पर्यंत बाजारात आणली जाणार आहेत. मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार २०२५ पर्यंत भारतात लाँच होईल. २०३० पर्यंत आणखी पाच मॉडेल्स लाँच होतील.
सर्वप्रथम जिमनी इलेक्ट्रिक ही कार युरोपीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार आहेत. तसेच भारतीय बाजारपेठेत पाच दरवाजे असणारी इलेक्ट्रिक ऑफ-रोडर म्हणून लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र अजून ही कार भारतात कधी लाँच होणार याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.
याचाच अर्थ युरोपीय बाजारपेठेत CO2 च्या नियमांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने जिमनीला खासगी वाहन म्हणून आणले जाईल. आता सध्या तिथे ते व्यावसायिक वाहन विकले जात आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन येते. जे १०० बीएचपी पॉवर जनरेट करते. तसेच या मॉडेलमध्ये 4×4 ड्राइव्ह येतो.
एका अधिकृत दस्तऐवजात असे नमूद करण्यात आले आहे की, सुझुकीची ICE-शक्तीवर चालणारी मॉडेल्स २०३० या आर्थिक वर्षांपर्यंत देशांतर्गत बाजारपेठांमधील ६० टक्के भाग व्यापून टाकतील. यामध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा १५ टक्के असणार आहे. तसे बाजारामधील २५ टक्के वाटा हा हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे. कंपनी ४.३९ लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि कार्बन न्यूट्रल पोर्टफोलिओ सध्या करण्याच्या दृष्टीने ४.५ ट्रिलियन येन म्हणजेच (सुमारे २.८२ लाख कोटी रुपये) इतकी गुंतवणूक करेल.
सुझुकीने एक टीजर इमेज देखील जारी केली आहे.हा टिझर बघून असे दिसते की , कंपनी देशामध्ये Fronx EV आणि WagonR EV लाँच करेल. तसेच याशिवाय सुझुकी जिमनी स्टाईल ही मध्यम आकाराची एसयूव्ही असणार आहे. मारुतीची पहिली ईव्ही ही मध्यम आकाराची एसयूव्ही असणार आहे. जी २०२४-२०२५ मध्ये लाँच केली जाणार आहे. हे मॉडेल टोयोटोच्या 27PL प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जे 40PL आर्किटेक्चरचे परवडणारे मॉडेल आहे.
सुझुकी जिमनी इलेक्ट्रिक खास फीचर्स असलेले मॉडेल आहे. फक्त मारुती सुझुकीच नव्हे तर टाटा मोटर्सने देखील घोषणा केली आहे की,ते २०२५ मध्ये सिएरा एसयूव्ही इलेक्ट्रिक वाहन लाँच करतील . याशिवाय २०३० च्या अखेरीस नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही ची विस्तृत सिरीज लाँच करेल. एका अहवालानुसार जिमनी ईव्हीमध्ये ड्युअल-मोटर सेटअपसह तसेच मोठ्या बॅटरी पॅकसह लाँच होण्याची शक्यता आहे.