Suzuki Swift Special Edition Launched: विक्री वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना काहीतरी नवीन देण्यासाठी मारुती सुझुकीने आपली सर्वात लोकप्रिय कार स्विफ्टची स्पेशल एडिशन मार्केटमध्ये लाँच केली आहे. 4th जनरेशन स्विफ्ट मॉडेल देखील भारतीय बाजारपेठेत नंबर १ बनले आहे. अशातच, या कारचे 3rd जनरेशन मॉडेल थायलंडमध्ये लाँच करण्यात आले आहे. स्विफ्ट स्पेशल एडिशनमध्ये गुलाबी, जांभळा आणि निळ्या शेड्समध्ये आला आहे.जपानी ऑटोमेकरने सुझुकी चिंतामुक्त कार्यक्रम सादर केला आहे ज्या अंतर्गत थायलंडमधील ग्राहक २६.२५% डाऊन पेमेंट आणि ४.१९% व्याज दराने कार खरेदी करू शकतात.
नजर हटणार नाही असा लूक
या ग्रेडियंटमध्ये फ्रँट साईडला पिंकीश पर्पल शॅडो आहे आणि मागील बाजूस ब्ल्यू शेड आहे. ज्यामुळे या कारचा लुक चांगला वाटतो. याकारमध्ये व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलरचे स्ट्रिप्स लावेल आहे. स्पोर्टीनेस वाढवण्यासाठी याला ग्लॉस ब्लॅक फिनिशसह अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि त्याच डिझाइनचे एलईडी टेल लाइट्स देखील आहेत. त्याची सुरुवातीची किंमत ५७,००० THB (सुमारे १४ लाख रुपये) आहे.
इंजिन आणि पॉवरट्रेन
या स्पेशल एडिशनमध्ये १.२-लिटर K12M 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे, जे ८३ PS ची पीक पॉवर आणि १०८ Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. जे CVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यामध्ये कंपनी ७ वर्षांसाठी फ्री maintance service, ७ वर्षांसाठी फ्री वॉरंटी आणि ७ वर्षांसाठी फ्री रोड साइड असिस्टंट सर्व्हिस देत आहे.
हेही वाचा >> Bajaj Sale: बजाजच्या बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरुममध्ये गर्दी; फक्त ३० दिवसात विकल्या ४ लाखांहून अधिक गाड्या
सुझुकीने थायलंडमध्ये ‘ऑफरोड एडिशन’ नावाची नवीन विशेष आवृत्ती लाँच केली
जपानी ऑटोमेकर ७ वर्षांसाठी मोफत सुझुकी मेंटेनन्स सेवा, कंपनीकडून ७ वर्षांची मोफत वॉरंटी आणि सुमारे ७ वर्षांसाठी मोफत रस्त्यालगत सहाय्य सेवा देत आहे. याव्यतिरिक्त, सुझुकीने थायलंडमध्ये ‘ऑफरोड एडिशन’ नावाची नवीन विशेष आवृत्ती लाँच केली आहे. जिमनी ऑफरोड एडिशन सिंगल-टोन व्हेरियंटसाठी भारतीय रुपयांमध्ये ४३.३७ लाख आणि ४४.१० लाख रुपये मोजावे लागतील.