सुझुकी मोटरसायकल इंडियाने आज त्यांची नवीन अॅडव्हेंचर बाईक V-Strom २५० भारतीय बाजारपेठेत लॉंच केली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या नवीन बाईकचा टीझर रिलीज केला होता. या बाईकची किंमत २.११ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. V-Strom २५० भारतातील सर्व सुझुकी प्रीमियम डीलरशिपवर उपलब्ध असेल. ही बाईक KTM २५० Adventure, Benelli TRK २५१ यांसारख्या बाईकशी टक्कर देईल.
V-Strom २५० मध्ये काय खास आहे
भारतात लॉंच केलेली ही सुझुकी V-Strom २५० परदेशात विकल्या जाणाऱ्या बाइक्सपेक्षा खूपच वेगळी आहे. ही बाईक Gixxer २५० रेंज प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि तिचे मेकॅनिकल त्यांच्यासोबत शेअर करते. डिझाइनच्या बाबतीत, बाइकला ऑल-एलईडी हेडलॅम्प, एक उंच व्हिझर, स्प्लिट-सीट सेट-अप देण्यात येईल. तसेच नवीन V-Strom २५० ज्यात चॅम्पियन यलो नं. २, पर्ल ब्लेझ ऑरेंज आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक या तीन रंगांमध्ये ऑफर करण्यात आली आहे.
इंजिनसह इतर तपशील
V-Strom २५० या बाईकमध्ये २४९cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे जे क्वार्टर-लिटर Gixxers मध्ये देण्यात आले आहे. ही मोटर ९,३००rpm वर २६.१hp आणि ७,३००rpm वर २२.२Nm पीक टॉर्क जनरेट करते, जी ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. याला समोरील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स, मागील बाजूस मोनो-शॉक शोषक आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स मिळतात. ब्रेकिंग ड्युटीसाठी, बाईकला ड्युअल चॅनल ABS आणि दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक मिळतात.
कंपनीने काय सांगितले?
लाँच प्रसंगी बोलताना, सुझुकी मोटरसायकल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सतोशी उचिदा म्हणाले, “V-Strom SX लाँच करून २५० cc अॅडव्हेंचर बाइक स्पोर्ट्स सेगमेंट मध्ये प्रवेश जाहीर करताना आनंद होत आहे. नवीन V-Strom SX ची रचना अशा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे, ज्यांना स्पोर्ट्स अॅडव्हेंचर बाइक्सची आहे. व्ही-स्ट्रॉम एसएक्स शहर आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे. यासोबतच ही बाईक विविध प्रकारच्या भूप्रदेशात प्रवास करण्यासाठी देखील योग्य आहे.”