पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण आता सीएनजी (CNG) सेगमेंटकडे वळत आहेत. त्यामुळे भारतात सीएनजी कारची मागणी वाढत चालली आहे. आवड व मागणी लक्षात घेता अनेक कंपन्यादेखील आकर्षक सीएनजी कार बाजारात लाँच करत असतात. त्यानंतर काही काळापूर्वी मारुती सुझुकीने आपली नवीन स्विफ्ट पेट्रोल कार भारतात लाँच केली होती; या कारने सर्वात जास्त विक्री झालेल्या १० कारमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आता मारुती सुझुकीने स्विफ्ट एस-सीएनजी (S-CNG) कार लाँच केली आहे. तसेच खास गोष्ट अशी की, याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त आठ लाख १९ हजार रुपयांपासून सुरू होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकी स्विफ्ट एस-सीएनजी २०२४ : व्हेरिएंट्स व किंमत

मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी (CNG) एकूण तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असणार आहे.
१. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी व्हीएक्सआय (VXI) – आठ लाख १९ हजार ५०० रुपये.
२. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी व्हीएक्सआय प्लस (VXI+) आठ लाख ४६ हजार ५०० रुपये.
३. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी झेडएक्सआय (ZXI) नऊ लाख १९ हजार ५०० रुपये आहे.
(टीप – या सर्व किमती फक्त एक्स-शोरूम आहेत)

हेही वाचा…Tata Motors : सहा एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा अन् बरेच सेफ्टी फीचर्स; भारतात लाँच झाली कूपे-एसयूव्ही; किंमत फक्त…

स्विफ्ट वरील पॉवरप्लांट ही १.२ एल झेड (1.2L Z-) सीरिज मोटर आहे, जी सीएनजी मोडमध्ये ६९.७५ एचपी (69.75 Hp) चे पीक पॉवर आउटपूट, १०१.८ एनएम (101.8 Nm) कमाल टॉर्क विकसित करते. ही मोटर ५ स्पीड एमटीशी जोडलेली आहे आणि पेट्रोलच्या guise, ८१.६ एचपी (81.6 Hp) पीक पॉवर आणि ११२ एनएम कमाल टॉर्क विकसित करते.

मायलेज आणि रनिंग कॉस्ट :

मारुती सुझुकी स्विफ्ट एस-सीएनजीसाठी ३१.८५ किमी/किलो मायलेजचा दावा करत आहे. दिल्लीत सीएनजीची (CNG) किंमत ७६.५९ प्रति किलो मानल्यास, स्विफ्ट फक्त २.३३ रुपये प्रति किलोमीटर धावण्याची किंमत दर्शवते. पेट्रोलच्या guise, स्विफ्ट एमटी २४.८ kmpl च्या मायलेजचा दावा करते.

फीचर्स :

मारुती सुझुकी स्विफ्ट एस-सीएनजीमध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम प्लस, हिल होल्ड असिस्ट आदी सुरक्षा फीचर्स उपलब्ध आहेत. पुढे, स्विफ्ट एस-सीएनजी ऑटोमॅटिक क्लायमेट कण्ट्रोल, रिअर एसी व्हेंट, वायरलेस चार्जर, ६०.४० स्प्लिट मागील सीट, ७ इंचाची स्मार्ट प्ले प्रो इंफोटेनमेंट इंफोटाइनमेंट सिस्टम आदी अनेक फीचर्सचा यात समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swift cng maruti suzuki india launched gets a total of 3 variants check out all ex showroom price and must read features asp