Summer Car Care Tips: उन्हाळा सुरू झाला असून उष्ण वारे आता लोकांना अस्वस्थ करत आहेत. उन्हाळ्यात जशी आपण स्वतःची काळजी घेतो तशीच उन्हाळ्यात तुमच्या कारचीही विशेष काळजी घ्यावी लागते. प्रखर सूर्यप्रकाशात बाहेर उभ्या असलेल्या कारला आग लागण्याची आणि टायर फुटण्याची शक्यता असते, याशिवाय उष्णतेमुळे कारचा रंग आणि आतील भागालाही खूप त्रास होतो. या बातमीत आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्याचे पालन करून कारची योग्य काळजी घेतली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हात गाडी पार्क करू नका

जर तुम्ही कडक सूर्यप्रकाशात कार पार्क केली तर तिचा रंग फिका पडतो आणि गाडी वेळेपूर्वी जुनी दिसू लागते. हे टाळण्यासाठी गाडी सावलीत पार्क करा, पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध नसेल तर गाडी झाकून ठेवा. याशिवाय, तुम्हाला कारच्या केबिनची देखील काळजी घ्यावी लागेल, ज्यासाठी सनशेड सर्वात प्रभावी आहे आणि आतील भागाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. सनशेड्स हे जाळीसारखे प्लास्टिकचे तुकडे असतात जे कारच्या खिडक्यांना लावले जाऊ शकतात.

कारचा रंग सुरक्षित ठेवा

उन्हाळ्यात तुमची कार सावलीत ठेवण्यासोबतच तिला कव्हर लावून पॉलिश करूनही तिचा रंग जपता येतो. सूर्याची थेट किरणे कारवर पडतात, त्यामुळे त्याचा रंग उडतो, त्यामुळे कारवर पॉलिश पृष्ठभाग असल्यास थेट किरणांमुळे रंगाला इजा होत नाही. कारच्या आतील बाजूसही पॉलिश लावल्यास डॅशबोर्डपासून ते केबिनच्या इतर सर्व भागांना नुकसान होण्यापासून वाचवता येईल.

(हे ही वाचा: CNG Car Tips: उन्हाळ्यात तुमच्या सीएनजी कारची ‘अशी’ घ्या काळजी; लक्षात ठेवा ‘या’ पाच गोष्टी)

दर आठवड्याला टायरचं प्रेशर तपासा

अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे टायरचा वाढलेलं प्रेशर. उष्मा वाढल्याने गाडीच्या टायरचा दाबही वाढतो आणि टायर फुटण्याचा धोका वाढतो आणि लोक अपघाताला बळी पडतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी गाडीच्या टायरचं प्रेशर सतत तपासणे आणि निर्धारित मर्यादेपेक्षा थोडी कमी हवा भरणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: कारमध्ये CNG किट लावण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं नुकसान!)

एसीची सर्विसिंग

उन्हाळ्यात, कारचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एसी, जे तुम्हाला त्रासदायक गरम वाऱ्यापासून दूर ठेवते. अशा परिस्थितीत उन्हाळा येताच किंवा येण्यापूर्वी गाडीची एसी सर्विसिंग पूर्ण करा. यामुळे तुम्हाला कारमध्ये प्रवास करताना आराम मिळतो.

(हे ही वाचा: Electric Scooter Fire: इलेक्ट्रिक स्कुटर्सना आग का लागतेय? केंद्रीय समितीने सांगितलं कारण)

इंजिन तेल तपासा

गाडीचे इंजिन जास्त गरम होऊ नये म्हणून तुम्ही वेळोवेळी इंजिनचे तेल तपासावे. खराब झालेले इंजिन तेल कारला हानी पोहोचवत नाही आणि नवीन इंजिन तेल जास्त गरम होण्यापासून संरक्षण करते. याशिवाय कूलंट तपासत राहा. खरं तर, उन्हाळ्यात कार अधिक गरम होते, त्यामुळे कूलंट थंड ठेवण्यास खूप मदत करते.