car maintenance tips: अजूनही अधून मधून भारतातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून येत्या काही दिवसांत पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे पावसाळ्यानंतर गाड्यांची विशेष देखभाल घ्यायला हवी. खरं तर पाऊस कार मालकांसाठी अनेक आव्हाने घेऊन येतो. या आव्हानांमध्ये खडबडीत रस्ते, जास्त ओलावा, जास्त आर्द्रता आणि खड्डे, पाणी साचणे, चिखल, घाण यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. यामुळे कारच्या लूकवर परिणाम होतो, त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरही गाडीची तपासणी करून तिची काळजी घेणे नेहमीच महत्त्वाचे असते.

कार स्वच्छ धुवा

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Thieves run away carrying bullets by pretending to take test drive in Kondhwa
रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार

पावसाळ्यानंतर कारची काळजी घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी संपूर्ण कार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पावसाळ्यात गाडीवर माती, धूळ जमा झालेली असते, ती स्वच्छ करण्यासाठी कार धुणे खूप गरजेचे आहे. कार स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड, चाक साफ करणारा ब्रश याची आवश्यकता लागेल. तसेच कार पूर्णपणे साफ केल्यानंतर पेंटला संरक्षक कोटिंग देण्यासाठी आपण थोडेसे मेण लावू शकता.

गंज लागल्यास उपाय

अनेक कारमालक गाडीला गंज लागल्याचे दिसल्यास खूप घाबरतात. पावसाळ्यात त्याचा धोका वाढतो. पाणी आणि हवा मिळून कारच्या धातूच्या भागांवर परिणाम करतात, यामुळे गंज लागतो; ज्यावर नियंत्रण न ठेवल्यास वाहनाच्या महत्त्वपूर्ण धातूच्या भागांना नुकसान होऊ शकते. पावसाळ्यानंतर कारला गंज आहे का याची नीट तपासणी करा. गंज झाल्यास, कार गॅरेजमध्ये घेऊन जा.

टायर तपासा

टायर हा कारच्या नियमित काळजी घ्यावा असा महत्त्वाचा भाग आहे, मग तो कुठलाही ऋतू असो. पावसाळ्यात टायर खराब होऊ शकतात. खड्डे, घाण पाणी, चिखल आणि धूळ यांच्यामुळे टायर्सच्या रबरचे नुकसान होते, त्यामुळे टायर्सची योग्य काळजी घ्या.

कारच्या आतील भाग स्वच्छ करा

बाहेरील भागाप्रमाणेच कारच्या केबिनलाही पावसाळ्याचा फटका बसतो. ओलावा आणि आर्द्रतेमुळे दुर्गंध येतो. ही दीर्घकालीन समस्या टाळण्यासाठी यावर त्वरित उपचार केले पाहिजेत. कारमधील पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी चांगला इंटीरियर क्लिनर वापरा. ओलावा शोषून घेणारी उपकरणे आणि डिह्युमिडिफायर असणे उपयुक्त ठरू शकते. तसेच केबिनमध्ये एअर फ्रेशनरही वापरा.

हेही वाचा: इलेक्ट्रिक बाईक जास्त चार्ज करता? वेळीच व्हा सावध, नाहीतर निर्माण होईल मोठी समस्या

इलेक्ट्रिकल गोष्टी तपासा

पावसाळ्यात वाहनातील इलेक्ट्रिकल घटकांना मोठा फटका बसतो. कारमधील इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणे पावसामुळे खराब होतात, त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर लाइटिंग सिस्टिमसारखे इलेक्ट्रिक घटक तपासा आणि ते तात्काळ दुरूस्त करून घ्या.