Monsoon Care Tips: सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढेल. या दिवसांत तुमच्या कारची योग्य काळजी घेणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः या दिवसांत कारच्या रंगाकडेही लक्ष द्यायला हवे. कारण- पावसाळ्यात धूळ, घाण कारवर चिकटते; ज्यामुळे कारची चमक कमी होऊ शकते.
कारची चमक जशीच्या तशी ठेवण्यासाठी टिप्स
कार झाकून ठेवा
पार्किंगमध्ये कार उभी केली असल्यास धूळ आणि घाण यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कारला चांगले कव्हर घाला. पावसाळ्यात कधीही अचानक पाऊस सुरू होतो. या दिवसांत कोणत्याही झाडाखाली गाडी पार्क करू नका. कारण- त्यामुळे गाडीवर स्क्रॅच पडू शकतात.
बंद पार्किंगमध्ये गाडी पार्क करा
पावसाळ्यात पावसासोबत अनेकदा जोरदार वारेदेखील वाहतात. त्यामुळे गाडी नेहमी बंद पार्किंगमध्ये कार पार्क करा. कारण- जर तुम्ही बाहेर गाडी पार्क केली, तर पावसाच्या पाण्यामुळे गाडीचा रंग फिका पडू शकतो.
पाणी व्यवस्थित स्वच्छ करा
पावसाळ्यात गाडीवर पडणारे पाणी व्यवस्थित काढून टाका. पावसाचा एक थेंबही गाडीवर राहिला, तर त्यामुळे कारचा रंग आणि फिका पडेल. तसेच यामुळे गाडीची चमकही कमी होईल.
गंज लागण्यापासून वाचवा
पावसाळ्यात कारच्या काही भागांवर विशेषतः जुन्या भागांवर गंज येण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे कार नियमित तपासा आणि त्यावर त्वरित उपचार करा. अँटी-रस्ट स्प्रे लागू केल्याने गंज तयार होण्यास प्रतिबंध होतो.
वॅक्सचा वापर करा
पावसाळ्यात कारच्या पेंटला अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी तुम्ही त्यावर चांगल्या दर्जाचे वॅक्स लावू शकता. त्यामुळे कारवर आधीपासून असलेली घाण साफ होईल आणि रंग पूर्वीपेक्षा चांगला होईल.
हेही वाचा: तुमच्या स्पोर्ट्स बाईकची इंधन क्षमता वाढविण्यासाठी फॉलो करा ‘या’ पाच सोप्या टिप्स…
कारला पॉलिश करून घ्या
कारची आणखी चांगली काळजी घ्यायची असेल, तर पावसाळ्यापूर्वी कारला नवीन पद्धतीने पॉलिश करून घेऊ शकता. असे केल्याने कारची चमक आणखी चांगली होते आणि रंगदेखील व्यवस्थित राहतो.