Tata Altroz CNG: मारुती सुझुकी बलेनो ही एक लोकप्रिय कार आहे, जी किफायतशीर किंमत, स्टायलिश लूक आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे लोकप्रिय आहे. हे CNG मध्ये देखील येते परंतु आता Tata Altroz ​​CNG देखील आपल्या CNG आवृत्तीशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात आले आहे. Altroz ​​एक प्रीमियम हॅचबॅक आहे, ज्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. त्याची किमतही फारशी नाही. Altroz ​​च्या CNG प्रकारांच्या किमती ७.५५ लाख रुपयांपासून सुरू होतात आणि टॉप मॉडेलसाठी १०.५५ लाख रुपयांपर्यंत जातात. अल्ट्रोज सीएनजीला XE, XM+ XM+ (S), XZ, XZ+ (S) आणि XZ+ O (S) सारख्या व्हेरियंटला आणले आहे. टाटाच्या या सीएनजी कारमध्ये सेगमेंट फर्स्ट ट्विन सिलिंडर सीएनजी टँक सोबत सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जर सारखे फीचर्स दिले आहेत.

Tata Altroz CNG मध्ये काय खास आहे?

कंपनीने या कारमध्ये १.२L रेव्होट्रॉन बाय-फ्यूअल इंजिन दिले आहे, जे पेट्रोल मोडमध्ये ८८Ps पॉवर आणि ११५Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, याच्या CNG मोडमध्ये इंजिन ७३.५ Ps पॉवर आणि १०३Nm टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज २३-२५ किलोमीटर असण्याचा अंदाज आहे. या प्रीमियम सीएनजी हॅचबॅकमध्ये सिंगल अॅडव्हान्स इयूसी आणि डायरेक्ट स्टेट सीएनजीसारखे फीचर्सदेखील मिळतात.

OpenAI launch o1 and o1 mini
OpenAI कडून नवीन एआय मॉडेल्स लाँच; स्पर्धा परीक्षांसाठी ठरणार उपयुक्त; जाणून घ्या वैशिष्ट्ये
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
maharashtra bjp chief bawankule s son audi hits several vehicles in nagpur driver arrested
बावनकुळेंच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक; नागपुरातील घटना; चालकासह एकाला अटक
iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max
iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max: आयफोन १६ साठी खर्च करणे किती फायद्याचे? पाहा ‘हे’ चार फीचर्स
ats busts fake telephone exchange center in kondhwa
पुण्यातील कोंढव्यात एटीएसचा छापा, बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा केला पर्दाफाश
Trademark Violation, namesake restaurant, pune,
व्यापार चिन्हाच्या उल्लंघनाचा वाद : पुण्यातील नेमसेक रेस्टॉरंटला बर्गर किंग नाव वापरण्यास तूर्त मज्जाव

(हे ही वाचा : भारतातील सर्वात सुरक्षित कार कोणती माहितेय का? तुमच्या फॅमिलीसाठी एकदम ‘परफेक्ट’ आहे ‘ही’ गाडी )

या सीएनजी कारमध्ये कंपनी व्हॉईस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ देत आहे, जी व्हॉईस कमांडद्वारे ऑपरेट केली जाईल. म्हणजेच, आपण आवाज द्याल आणि त्याचे इलेक्ट्रिक सनरूफ उघडेल आणि बंद होईल. प्रीमियम हॅचबॅक सीएनजी कार म्हणून, हे वैशिष्ट्य खूप चांगले आहे. याशिवाय कंपनी या कारमध्ये अनेक उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये देखील समाविष्ट करत आहे, जी सीएनजी कारकडून अपेक्षित आहे.

Altroz ​​CNG मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ऑटो वायपर्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

टाटा अल्ट्रोज सीएनजीचे सर्व व्हेरियंट्सच्या किमती

Tata Altroz XE CNG व्हेरियंटची किंमत ७.५५ लाख रुपये
Tata Altroz XM+ CNG व्हेरियंटची किंमत ८.४० लाख रुपये
Tata Altroz XM+ (S) CNG व्हेरियंटची किंमत ८.८५ लाख रुपये
Tata Altroz XZ CNG व्हेरियंटची किंमत ९.५३ लाख रुपये

Tata Altroz XZ+ (S) CNG व्हेरियंटची किंमत १०.०३ लाख रुपये
Tata Altroz XZ+ O (S) CNG व्हेरियंटची किंमत १०.५५ लाख रुपये