Tata Motors ही देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेटेड मॉडेल्स लॉन्च करत असते. तसेच कंपनी त्यात ग्राहकांच्या सुरक्षेची खास काळजी घेते. टाटाने नुकतीच भारतीय बाजारपेठेमध्ये आपली टाटा अल्ट्रोझला नवीन फीचर्ससह लॉन्च केले आहे. या नवीन टाटा अल्ट्रोझ ICNG ला ७.५५ लाख (एक्स शोरूम) रुपये या किंमतीमध्ये लॉन्च केले आहे. तथापि कंपनी याची पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या मॉडेलची विक्री देखील करते. आज आपण टाटा अल्ट्रोझच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट मधील तुलना जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा अल्ट्रोझ सीएनजी Vs पेट्रोल – इंजिन आणि गिअरबॉक्स

Financial Express च्या वृत्तानुसार टाटा अल्ट्रोझ ही दोन पेट्रोल इंजिन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याम्हद्ये एक नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड आणि टर्बो पेट्रोल युनिट अशा दोन इंजिनचा समावेश आहे. हे दोन्ही इंजिन वेगवेगळे ट्रॅक आणि पॉवर जनरेट करतात. तर icng मॉडेलमध्ये १.२१ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते. जे ७२.४ बीएचपी पॉवर आणि १०३ एनएम पीक टॉर्क जनरेट करतात. यासह ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 29 May: ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर

मायलेज आणि बूट स्पेस

टाटा अल्ट्रोझ ही कार आपल्या दोन पेट्रोल इंजिनमध्ये अनुक्रमे १९.३ किमी आणि १८.५ किमी इतके मायलेज देते. तथापि याच्या सीएनजी व्हेरिएंटच्या मायलेजबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पेट्रोल व्हेरिएंटच्या बूट स्पेसबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ३४५ लिटरचा बूट स्पेस मिळतो. सीएनजी व्हेरिएंटमध्ये २१० लिटरचा बूट स्पेस मिळतो.

किंमत

टाटाच्या या कारचे पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ६.६० लाख रुपयांपासून ते १०.०० लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच याच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत ७.५५ लाखांपासून १०.५५ लाखांपर्यंत आहे.

हेही वाचा : यामाहा R15 V4 ते बजाज पल्सर NS160 पर्यंत ‘या’ आहेत शक्तिशाली इंजिन असणाऱ्या टॉप ५ बाईक्स, जाणून घ्या किंमत

कोणाशी करणार स्पर्धा

टाटा अल्ट्रोझ कंपनीने सीएनजी आणि पेट्रोल या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. आता आपण पेट्रोल आणि सीएनजी मॉडेलची किंमत, इंजिन यामधील तुलना पहिली. देशांतर्गत बाजारपेठेत टाटा अल्ट्रोझशी स्पर्धा करणाऱ्या वाहनांमध्ये मारुती सुझुकी बलेनो, ह्युंदाई i20 आणि टोयोटा ग्लान्झा सारख्या वाहनांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata altroz icng v petrol camparision in price milage and engine boot space check details tmb 01