हॅचबॅक सेगमेंटच्या फाईव्ह सीटर फॅमिली वाहनांना कार मार्केटमध्ये नेहमीच जास्त मागणी असते. आता टाटा ने या सेगमेंटमध्ये आपली नवीन कार Tata Altroz ​​Racer लाँच केली आहे, जी मारुतीच्या स्विफ्टला त्याच्या किमतीच्या श्रेणीत टककर देत आहे. Altroz ​​नवीन रंग आणि लूकमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्विफ्टमध्ये लवकरच सीएनजी व्हर्जन सादर करण्यात येणार आहे. आज आम्ही तुम्हाला दोन्ही कारच्या फीचर्स आणि किमतीबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

टाटा अल्ट्रोझ रेसर इंजिन

प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील ही भारतातील पहिली कार आहे, ज्यामध्ये ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड सीट आणि व्हॉइस असिस्टंट इलेक्ट्रिक सनरूफ आहे. ही शक्तिशाली कार उच्च पिकअपसाठी १२० एचपी पॉवर जनरेट करते. त्याचे टॉप मॉडेल १०.९९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल. ही हॅचबॅक कार टर्बो इंजिनमध्येही दिली जात आहे.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स

१०.२५ इंच टच स्क्रीन सिस्टम आणि ६ स्पीड गिअरबॉक्स

कारमध्ये १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲडजस्टेबल सीट आणि तीन व्हेरियंट R1, R2, R3 देण्यात आले आहेत. Tata Altroz ​​Racer मध्ये १.२ लिटर इंजिन आहे. हे तीन सिलेंडर इंजिन आहे, जे उच्च गतीसाठी १७०Nm टॉर्क जनरेट करते. हे ५ आणि ६ स्पीड गिअरबॉक्ससह येते. कारला स्पोर्टी लूक देण्यात आला असून यात हेवी सस्पेन्शन पॉवर आहे.

(हे ही वाचा : बाजारपेठेत उडाली खळबळ; Bajaj ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल, १२३ किमीची ड्रायव्हिंग रेंज, किंमत फक्त… )

१६ इंच अलॉय व्हील आणि आकर्षक रंग पर्याय

आकर्षक ॲटोमिक ऑरेंज, अव्हेन्यू व्हाईट आणि प्युअर ग्रे या चार रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार ऑफर केली जात आहे. त्याच्या बोनेट आणि छतावर पांढऱ्या रंगाचे रेसिंग पट्टे देण्यात आले आहेत. कारमध्ये १६ इंच अलॉय व्हील आणि डिजिटल डिस्प्ले आहे. ही कार ३६० डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण यांसारख्या वैशिष्ट्यांसह येते. अल्ट्रोझ रेसरसाठी २१,००० रुपयांच्या टोकन किमतीवर बुकिंग सुरू झाली आहे. कारचे बेस मॉडेल ९.४९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये दिले जात आहे.

मारुती स्विफ्टमध्ये शक्तिशाली १.२ लीटर इंजिन

ही कार ऑन-रोड ७.८६ लाख रुपयांच्या सुरुवातीची किंमत आहे. कारमध्ये १.२ लीटर इंजिन आहे. ही ५ सीटर कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये देण्यात आली आहे. लवकरच कंपनी आपले चौथ्या जनरेशनचे सीएनजी इंजिन लाँच करणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार पेट्रोलवर सहजपणे २६ kmpl मायलेज देते. या स्टायलिश कारमध्ये LED हेडलाईट आणि मागील सीटवर चाइल्ड अँकरेज सारखी वैशिष्ट्ये आहेत. या कारला ६ प्रकार आणि डिजिटल क्लस्टर देण्यात आले आहे. कारमध्ये अलॉय व्हील आणि ९ इंच इंफोटेनमेंट सिस्टम आहे. ही कार सहा एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह आहे.

Story img Loader