हॅचबॅक सेगमेंट हा कार क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय सेक्शन आहे ज्यामध्ये आगामी कार त्यांच्या किंमती आणि मायलेजसाठी पसंत केल्या जातात. पण या सेगमेंटमध्ये अशा काही कार आहेत, ज्या त्यांच्या किंमती आणि मायलेज व्यतिरिक्त त्यांच्या डिझाईन आणि फीचर्ससाठी देखील पसंत केल्या जातात.

या स्टायलिश हॅचबॅक कार्सच्या रेंजमध्ये आम्ही Tata Altroz ​​बद्दल बोलत आहोत जी त्यांच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कारमध्ये गणली जाते आणि तिच्या किमती व्यतिरिक्त मायलेज आणि सिक्यूरिटी फीचर्ससाठी प्राधान्य दिले जाते.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या

Tata Altroz ​​XE ची सुरुवातीची किंमत म्हणजेच बेस मॉडेल ६,२९,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड असताना ७,१५,५७९ रुपयांपर्यंत जाते. पण इथे आम्ही अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला ही हॅचबॅक कार खरेदी करण्यासाठी ७ लाख रुपये एकत्र खर्च करावे लागणार नाहीत.

आणखी वाचा : Odysse Hawk इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर १७० किमी रेंज देते, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Tata Altroz XE Finance Plan
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला ही कार फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करायची असेल, तर येथे बँक त्यासाठी ६,४३,५७९ रूपये कर्ज देईल.

हे कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला ७२,००० रुपये किमान डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर दरमहा १३,६११ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

टाटा अल्ट्रोझच्या बेस मॉडेलवर दिलेल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या ५ वर्षांमध्ये बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि EMI प्लॅनचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही या Tata Altroz ​​XE चे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.

आणखी वाचा : मोठ्या कुटुंबासाठी केवळ ६४ हजारात मिळतेय रेनॉल्ट ट्रायबर, जाणून घ्या ऑफर

Tata Altroz XE Engine and Transmission
Tata Altroz ​​मध्ये कंपनीने ११९९ cc चे इंजिन दिले आहे. हे इंजिन ८४.८८ bhp पॉवर आणि ११३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.

Tata Altroz XE mileage
मायलेजबाबत, टाटा मोटर्सचा दावा आहे की ही Tata Altroz ​​XE 18.53 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित केले गेले आहे.

आणखी वाचा : २ तासात विकला गेला ‘या’ इलेक्ट्रिक SUV चा स्टॉक, २०२३ साठी प्री बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Altroz XE Features
Tata Altroz ​​XE मध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम सादर केले आहे. समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज.अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Story img Loader