टाटा मोटर्स एक कार निर्माता ब्रँड म्हणून ग्राहकांचे मन जिंकत आहे. आता कंपनी एक नवीन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करीत आहे. या कारच्या लाँचिंग नंतर मिड साइज एसयूव्ही सेगमेंट मध्ये जबरदस्त स्पर्धा वाढणार आहे. टाटा मोटर्स आता आपली आगामी ‘एसयूव्ही ब्लॅकबर्ड’ लवकरच भारतात आणण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही बाजारपेठेत क्रेटा आणि वेन्यूला जबरदस्त टक्कर देणार आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन ब्लॅकबर्ड कंपनीच्या स्वतःच्या नेक्सॉन एसयूव्हीवर आधारित असेल. टाटा ब्लॅकबर्ड कूपे डिझाइन लँग्वेज सोबत भारतात एन्ट्री करणार आहे.

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्हीची वैशिष्ट्ये

SpaceX succeeds in bringing the rocket back to the launch site
विश्लेषण : रॉकेट उडाले.. फिरुनी परतले.. स्थिरावले प्रक्षेपणस्थळी! स्पेसएक्स स्टारशिपच्या अद्भुत पाचव्या चाचणीची चर्चा जगभर का?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
bogus medicines in Pune, bogus medicines,
सावधान! पुण्यात बोगस औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून तीन विक्रेत्यांवर कारवाई
OIL India Recruitment 2024 Oil India Limited is conducting recruitment process for various posts
Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी! ऑयल इंडिया लिमिटेडकडून मेगा भरती
Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर
Manager Fired HR
मॅनेजरचा CV क्षणार्धात नाकारला, एचआरची नोकरीच गेली; नेमकं काय घडलं वाचा!
BMW CE 02 India Launch Date Revealed Bmw Launch New Electric Scooter Ce 02 In October 2024 Check Price & Features
BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटर ऑक्टोबरमध्ये होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिसर्च
upi
त्रिनिदाद-टोबॅगोमध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध

या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला ऑल ब्लॅक थीम मिळेल. शक्यता आहे की, टाटा याला थ्री रो सीटिंग सोबत बाजारात उतरवू शकते. याशिवाय, कारमध्ये तुम्हाला ८.८ इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. ज्याला आपण वायरलेस अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो सोबत कनेक्ट करू शकतो. यात तुम्हाला वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पनारोमिक सनरूफ आणि लेदर सीट सारखे फीचर्स या कारमध्ये मिळू शकते.

टाटाच्या नवीन ब्लॅकबर्ड एसयूव्हीची लांबी सध्याच्या टाटा नेक्सॉनपेक्षा जास्त असेल. त्याची रचना कूप शैलीमध्ये असू शकते. अहवालानुसार, त्याचा आकार ४.३ मीटरपेक्षा जास्त असेल. जास्त लांबीमुळे, त्याला त्याच्या केबिनमध्ये अधिक जागा आणि लेगरूम मिळेल. सध्या Hyundai Creta ला खूप पसंती दिली जात आहे आणि तिची स्थिती मजबूत आहे. Hyundai फक्त Creta ला खरी स्पर्धा देण्यासाठी Blackbird SUV आणत असल्याची पुष्टी झाली आहे. म्हणजेच ही एसयूव्ही कूप स्टाईलमध्ये येऊ शकते आणि बाजारात तगडी स्पर्धा देऊ शकते. त्याच्या रचनेत नवीनता दिसेल. हे कूप-शैलीच्या रूफलाइनसह देऊ केले जाऊ शकते. ब्लॅकबर्डच्या पुढच्या, आकारात आणि मागच्या भागात खूप नावीन्य असेल.

आणखी वाचा : अरे वा! ५०,००० रुपयात घरी आणा जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; चालवण्यासाठी भासणार नाही ड्रायव्हिंग लायसन्सची गरज

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही डिझाईन आणि इंजिन

नवीन डिझाईन फ्रंट आणि रियर एक्सटेरियरमध्ये दिले जाऊ शकते. सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी मॉडेलमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स वितरण, वाहन स्थिरता व्यवस्थापन आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण यांसारखी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये मिळू शकतात.

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्हीमध्ये १.५-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आढळू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी काही काळापासून या इंजिनवर काम करत आहे. असे मानले जाते की हे इंजिन १६०hp पॉवर जनरेट करेल. हे नवीन इंजिन नेक्सॉनमध्ये आढळलेल्या १.२-लिटर इंजिनपेक्षा अधिक शक्तिशाली असू शकते. ही SUV मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह दिली जाईल.

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही किंमत

कंपनीने अद्याप नवीन टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही बद्दल कोणतेही विधान केलेले नाही, परंतु या वाहनाची एक्स-शोरूम किंमत सुमारे ११ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाईल.