टाटा मोटर्स ही देशातील तिसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स ही एसयूव्हीच्या विक्रीसाठीही ओळखली जाते. कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ही एसयूव्ही आहे. कंपनीची टाटा नेक्सॉन सर्वाधिक खरेदी केली जात आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये या कारला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे.
Tata Nexon पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत १० लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ही कार अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. तुम्हीही Tata Nexon खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी या कारवरील फायनान्स प्लॅन घेऊन आलो आहोत.
टाटा नेक्सॉन किंमत
Tata Nexon ची किंमत ७.८० लाख ते १४.५० लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत आहे. हे एकूण आठ ट्रिममध्ये विकले जाते. त्यात जास्तीत जास्त पाच जण बसू शकतात. ही कार खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट पुरेसे नसेल तर तुम्ही त्यासाठी कर्जासाठी अर्ज करू शकता.
(हे ही वाचा : देशात ज्या स्कूटरसाठी शोरूम्समध्ये लागतेय रांग, आता आणा १७ हजारात घरी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त डील )
टाटा नेक्सॉन फायनान्स प्लॅन
जर तुम्ही बेस व्हेरिएंटसाठी गेलात तर त्याची ऑन-रोड किंमत रु. ८.८५ लाख असेल. येथे तुम्ही १० टक्के डाउनपेमेंट म्हणजेच ९०,००० रुपये भरून ते घरी आणू शकता. व्याजदर आणि कर्जाचा कालावधी प्रत्येक बँकेत बदलू शकतो. तुम्ही ९.८ टक्के व्याजदर आणि १० टक्के डाउन पेमेंटसह ५ वर्षांच्या कर्जासाठी अर्ज केल्यास, दर महिन्याला तुम्हाला १६,८४५ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. एकूण कर्जाची रक्कम ९,०९,३७४ रुपये असेल, ज्याचे एकूण व्याज रुपये १,०१,०८२ असेल. अशा प्रकारे, तुम्हाला पाच वर्षांत एकूण १०,१०,४५६ रुपये द्यावे लागतील.
यामध्ये व्याजाची रक्कम आणि कर्जाचा कालावधी बँकेच्या नियमांवर अवलंबून असू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधून त्यांच्याकडून तपशीलवार माहिती घ्यावी. हे EMI उदाहरण फक्त तुमच्या सोयीसाठी आहे आणि तुमच्या बँकेने ठरवून दिलेल्या व्याजदरापेक्षा वेगळे असू शकते.