Tata Curvv & Hyundai Creta : टाटा मोरटर्सनी कर्वला लाँच करत सर्वात यशस्वी मिड साइज एसयुव्ही Hyundai क्रेटा ला आव्हान दिले आहे. सिट्रोन बेसाल्टनंतर आता या सेगमेंटमध्ये प्रवेश करणारी दुसरी कूप एसयुव्ही आहे आणि दोन्ही नवीन मॉडेल इतर प्रतिस्पर्धींपेक्षा कमी किमतीवर उपलब्ध आहे. आता तुम्हाला वाटेल की खरंच कर्वमध्ये असे काही फिचर्स आहेत का, जे क्रेटाला मागे टाकू शकतात? त्यासाठी तुम्हाला टाटा कर्व आणि Hyundai क्रेटा यांच्या किंमती आणि फिचर्स जाणून घ्यावे लागतील.

Hyundai ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. Hyundai ची Creta भारतात खूप लोकप्रिय आहे. यामध्ये जबरदस्त फिचर्स पाहायला मिळतात तर टाटाच्या सर्वच मॉडेल्सची बाजारात एकच चर्चा पाहायला मिळते. आता टाटाने टाटा कर्व २ सप्टेंबर रोजी लाँच केली. कंपनीने आपले इलेक्ट्रिक मॉडेल आधीच लाँच केले होते, त्यानंतर आता ते पेट्रोल आणि डिझेल मॉडेलमध्ये आणले आहे.

Fussclass Dabhade Teaser
लोकप्रिय कलाकार, कौटुंबिक गोष्ट अन्…; ‘फसक्लास दाभाडे’मध्ये उलगडणार खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी, पाहा टीझर
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
In Kalyan East on Saturday night migrant family abused and beat up three members of Marathi family
सराफी पेढीवर दरोडा टाकणारा चोरटा गजाआड
R Ashwin’s Net Worth Income salary Cars Collections in Marathi
R Ashwin Net Worth: ९ कोटींचं घर, मीडिया कंपनी, लग्झरी कार…, १०० कोटींपेक्षा जास्त आहे अश्विनची एकूण संपत्ती
Tharla Tar Mag Serial New Track
‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन वळण! सायलीचा लूकही बदलला; मधुभाऊंनी लेकीसाठी घेतला कठोर निर्णय…; पाहा प्रोमो
Tula Shikvin Changalach Dhada promo
भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी! सासूला खडेबोल सुनावून अक्षरा घर सोडून जाणार…; मास्तरीण बाईंना अधिपती म्हणाला…

Tata Curvv आणि Hyundai Creta

टाटा मोटर्सच्या कर्वची किंमत १० लाख रुपयांपासून सुरू होते. या कारची किंमत क्रेटाच्या तुलनेत एक लाखापेक्षा कमी आहे. कर्व चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. स्मार्ट, प्योअर, क्रिएटिव्ह आणि अक्म्पलिश्ड, यामध्ये आणखी पर्याय आहेत.

याशिवाय Hyundai ची Creta E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX(O) या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कर्वची सुरुवातीची किंमत ३१ ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या बुकिंगसाठी आहे. बुकिंग सध्या सुरू आहे. डिलीव्हरी १२ सप्टेंबर पासून सुरू होणार.

हेही वाचा : Tata Motors : सहा एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा अन् बरेच सेफ्टी फीचर्स; भारतातील लाँच झाली कूपे-एसयूव्ही; किंमत फक्त…

Tata Curvv आणि Hyundai Creta चे फिचर्स

टाटा मोटर्स नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देत नाही पण याबरोबर १.२ लीटर टर्बो पेट्रोल व्हेरियंट आहे. याशिवाय १.२ रेवोटॉन इंजिन ११८ बीएचपी आणि १७० एनएम चा टॉर्क देतात. नवीन १.२ लीटर GDI इंजिन १२३ बीएचपी आणि २२५ एनएम तयार करते तर १.५ लीटर डिझेट इंजिन ११६ बीएचपी आणि २६० एनएमचा टॉर्क तयार करते. तिन्ही इंजिनची ६ स्पीड मॅन्युअल किंवा ७ स्पीज डुअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायाबरोबर येतात. कर्व भारतात तयार होणारे पहिले डिझेल वाहन आहे जो ७ स्पीड डिसीटीसह उपलब्ध आहे.

क्रेटाचे तीन पावरट्रेन पर्याय उपलब्ध आहे. एक म्हणजे १.५ लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल, दुसरे म्हणजे १.५ लीटर टर्बो आणि तिसरे म्हणजे १.५ लीटर डिझेल. नॅचरली एस्पिरेटेड इंजिन ११३ बीएचपी आणि १४३.८ एनएम प्रदान करतात ज्याला ६ स्पीड मॅन्युअल किंवा सीव्हीटी ऑटोमॅटीकबरोबर जोडला जातो. टर्बो पेट्रोल इंजिन १५७.५ बीएचपी आणि २५३ एनएम तयार करत आहे. जे विशेष करून ७ स्पीड डुअल क्लच ट्रान्समिशनबरोबर उपलब्ध आहे. शेवटी डिझेल इंजिन ११४ बीएचपी आण २५० एनएमचा टॉर्क तयार करतो. ज्याला ६ स्पीड मॅन्युअल टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिकबरोबर जोडले जाते.

Story img Loader