EV fire in Pune: भारतात इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून देशाच्या विविध भागातून इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या, बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना समोर येत आहेत. आता इलेक्ट्रिक दुचाकींनंतर इलेक्ट्रिक कारला आग लागल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही देशातली सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ इलेक्ट्रिक कारला लागली आग

पुण्यातील कात्रज येथे ‘टाटा नेक्सॉन ईव्ही’ला आग लागल्याची घटना इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुण्यातील कात्रज चौकातील रिलायन्स मार्टसमोर ही घटना घडली. मात्र, ईव्हीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेनंतर टाटा मोटर्सने आगीच्या कारणाचा तपास केला. अशी माहिती मिळाली आहे की, इलेक्ट्रिक एसयूव्हीची अनधिकृत दुरुस्ती करण्यात आली होती, त्यानंतर थर्मल घटना घडली आणि त्याच कारणामुळे आग लागली. टाटा मोटर्सनेही घटना आणि तपासाबाबत निवेदन जारी केले आहे.

(हे ही वाचा : TVS अन् OLA पाहून झाले थक्क, देशात आली ५४ हजाराची ई-स्कूटर, स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह अनलिमिटेड रेंज)

इलेक्ट्रिक कारला आग लागण्याचे कारण काय?

टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, अनधिकृत कार्यशाळेत दुरुस्त केलेल्या Nexon EV च्या डाव्या हेडलॅम्पच्या थर्मल घटनेमुळे ईव्हीला आग लागली. निवेदनात म्हटले आहे की, “हे १६ एप्रिल २०२३ रोजी पुणे, कात्रज येथे घडलेल्या थर्मल घटनेच्या संदर्भात आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तांत्रिक तज्ञांच्या पथकाने या घटनेचा सविस्तर तपास केला आहे.

कंपनीने सांगितले की, वाहनाची (ज्याला आग लागली) नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती, ज्यामध्ये डावा हेडलॅम्प अनधिकृत कार्यशाळेने बदलला होता. अनधिकृत वर्कशॉपद्वारे केलेली फिटमेंट आणि दुरुस्तीची प्रक्रिया चुकीची होती, ज्यामुळे हेडलॅम्प परिसरात इलेक्ट्रिकल फॉल्ट आणि थर्मल घटना घडली.