टाटा मोटर्सच्या एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यामुळेच कंपनी लवकरच टाटा हॅरियर एसयूव्ही (Tata Harrier SUV) आणि सफारी एसयूव्ही (Tata Safari SUV) चे फेसलिफ्ट लाँच करणार आहे, लोक या दोन्ही फेसलिफ्ट एसयूव्हीची वाट पाहत आहेत कारण त्यांची वैशिष्ट्ये जोरदार प्रगत असणार आहेत. काही काळापूर्वी चाचणीदरम्यान सफारी फेसलिफ्ट दिसली होती.
Tata Harrier SUV स्पॉट
आता हॅरियर फेसलिफ्ट देखील स्पॉट झाली आहे. यात नवीन फ्रंट फॅशिया, नवीन अलॉय व्हील्स, व्हर्टिकल हेडलाइन, एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल सिग्नेचर आणि मोठी ग्रिल मिळेल ज्यामुळे त्याचा लूक खूपच आक्रमक होतो. यावेळी टाटा या एसयूव्हीसह आपला नवीन लोगो उघड करू शकते.
काही रिपोर्टर्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या कारच्या उच्च व्हेरियंटमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ दिले जाईल, ज्यामुळे ती तरुणांमध्ये लोकप्रिय होऊ शकते. या दोन्ही फेसलिफ्ट SUV चा डॅशबोर्ड टेस्ट म्युल सारखाच दिसतील. यामध्ये क्लायमेट कंट्रोलसह नवीन टच आणि टँगल कंट्रोल्स देता येतात. कंपनी आपले नवीन स्टीयरिंग व्हील हॅरियर एसयूव्हीमधूनच देऊ शकते. यामध्ये मध्यभागी डिजिटल डिस्प्ले पाहायला मिळणार आहे.
(हे ही वाचा : ‘या’ लक्झरी कारला भारतीयांची मोठी पसंती, विक्रीमध्ये ९७ टक्क्यांची वाढ, खरेदीसाठी लागतेय ग्राहकांची रांग )
Tata Harrier SUV मध्ये २-लिटर टर्बो डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. मात्र, यावेळी पेट्रोल प्रकारात आणण्याचा विचार केला जात आहे. जर ते पेट्रोलमध्ये आणले तर त्यात १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल जे १७० बीएचपी पॉवर जनरेट करते. यामध्ये मॅन्युअलसोबत ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही दिला जाऊ शकतो.
सुरक्षेसाठी जबरदस्त फीचर्स
सुरक्षेसाठी, सहा एअर बॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, क्रॅश सेन्सर, पॉवर ब्रेक, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग यांसारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. याशिवाय यामध्ये एअर कंडिशनर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सीट बेल्ट वॉर्निंग, ऑटो हेड लॅम्प, रिमोट इंजिन स्टार्ट/स्टॉपसह अॅडजस्टेबल सीट्स, इंजिन चेक वॉर्निंग, बाहेरील तापमान डिस्प्ले, रिअर व्ह्यू मिरर, पॅसेंजर साइड मिरर, बूट लाइट असेल. या दोन्ही कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या दोन्ही कारमध्ये ADAS फीचर्स दिले जाणार आहेत.
२०२३ टाटा हॅरियर आणि सफारी एसयूव्हीची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.