सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची जास्त मागणी आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मग ते दुचाकी वाहन असो किंवा कार ग्राहक यांची रेंज फार मोठी आहे. सध्या, टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक कारची देशातील सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे. कंपनीने आधीच टाटा नेक्सॉन, टिगोर आणि टियागो सारख्या कारचे इलेक्ट्रिक अवतार आणले आहेत. आता कंपनीने आपल्या आलिशान एसयूव्ही ‘हॅरियर’चे इलेक्ट्रिक व्हर्जन तयार केले आहे. ते लवकरच भारतीय बाजारपेठेत सादर केले जाईल. याची झलक ऑटो एक्सपो २०२३ मध्ये दाखवण्यात आली आहे.

टाटा हॅरियर ईव्ही बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. एका चार्जवर ते सुमारे ५०० किलोमीटर धावू शकते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, Tata Harrier EV मध्ये Advanced Driving Assistant System (ADAS) समाविष्ट असेल. यामध्ये रडार तंत्रज्ञान, कॅमेरे, सेन्सर्सचा वापर करून व्यक्तीला सतर्क केले जाते. नवीन कारला लोगो म्हणून मोठ्या आकाराचा “T” देखील मिळू शकतो. कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि रेन सेन्सिंग वायपर्स यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील.

Belapur cidco parking news in marathi
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
roads Mumbai roads mechanical sweepers mumbai,
मुंबईतील रस्ते आणखी चकचकीत, मार्चपर्यंत १५ यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात
BCCI assurance on IPL security fee reduction issue Mumbai news
पोलिसांना लवकरच थकबाकी; ‘आयपीएल’ सुरक्षा शुल्क कपात प्रकरणी ‘बीसीसीआय’चे आश्वासन
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Transport Minister Pratap Sarnaik proposal regarding the cable car project Mumbai news
महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प उभारण्याची गरज; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रस्ताव
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

Tata Harrier EV वैशिष्ट्ये

बाहेरून बोलायचे झाले तर आकर्षक कनेक्टिंग LED DRL स्ट्रिप, रियर पार्किंग सेन्सर, कॅमेरा, १७-इंच अलॉय व्हील आणि ४२५ लीटर बूट स्पेस दिली जाऊ शकते. EV ला Android Auto आणि Apple CarPlay सह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देखील मिळेल. यात वेलकम फंक्शन आणि मेमरी वैशिष्ट्यासह ६-साइड पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट देखील मिळेल. या ईव्ही वाहनात सामान्य चार्जर आणि फास्ट चार्जर दोन्ही चार्जिंग पर्याय उपलब्ध असतील.

(हे ही वाचा: Hero ने एक लिटर पेट्रोलमध्ये ६८ किमी धावणारी बाईक केली बंद, आता ग्राहकांकडे कोणता पर्याय? )

Tata Harrier EV किंमत

टाटा हॅरियर ई-एसयूव्हीची किंमत ३० लाख ते ३१ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. कंपनीने ही कार कधी लाँच होणार याची माहिती अद्याप दिलेली नाही. पण असे मानले जाते की Tata Harrier EV पुढील वर्षी (२०२४) भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल. लाँच झाल्यावर, या कारची थेट स्पर्धा महिंद्राच्या Mahindra XUV700 शी होईल.

Story img Loader