Tata e-bike Launch: भारतात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत आहे. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. भारतासह जगभरात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा ट्रेंड जोर धरत आहे. लोक केवळ इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरमध्येच रस दाखवत नाहीत, तर इलेक्ट्रिक सायकलच्या विक्रीतही आता तेजी दिसून येत आहे. यामुळेच आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक सायकलचे नवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. आता रतन टाटा यांच्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची कंपनी असलेल्या स्ट्रायडरने या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही इलेक्ट्रिक सायकल Zeta रेंज अंतर्गत सादर करण्यात आली आहे. या ई-बाईकला ‘Zeeta Plus E-bike’ असे नाव देण्यात आले आहे. ही सायकल वाहतुकीचा विश्वासार्ह, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे.

(हे ही वाचा: देशातील ‘या’ सर्वात भारी १० सीटर MPV कारसमोर ५, ६, ७ अन् ८ आसनी पडल्या फिक्या? किंमत फक्त… )

बॅटरी आणि पॉवर

सायकल २१६Wh च्या एनर्जी आउटपुटसह ३६V-६Ah बॅटरी पॅक वापरेल. त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा अधिक शक्तिशाली बॅटरी आहे. ही सायकल कोणत्याही ट्रेनमध्ये सहज चढू शकते. त्याचा टॉप स्पीड २५ किमी/तास आहे. ही ई-सायकल एका चार्जवर ३० किमी अंतर कापू शकते.लमहत्त्वाचे म्हणजे, केवळ तीन ते चार तासांतच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होते, असे कंपनीने म्हटले आहे. या सायकलला केवळ १० पैसे प्रति किलोमीटर एवढा खर्च येतो

किंमत किती आहे?

कंपनीने हीइलेक्ट्रिक सायकल २६,९९५ रुपये किमतीची आहे. ही या सायकलची प्रास्ताविक किंमत आहे, याचा अर्थ सुरुवातीच्या काही ग्राहकांनाच ही सायकल या किमतीत मिळेल. नंतर या सायकलची किंमत ६,००० रुपयांनी वाढेल. ही सायकल तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.