Tata Motors ही देशातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता टाटा मोटर्सने बहुप्रतीक्षित अशी आपली टाटा पंच CNG कार लॉन्च केलीआहे. भारतीय बाजारात टाटा ICNG लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे टाटाच्या लाइनअपमध्ये टिआगो, Tigor आणि अल्ट्रोजनंतरचे चौथे सीएनजी मॉडेल बनले आहे. खरेदीदारांसाठी टाटा पंचचे सीएनजी व्हर्जन प्युअर(Pure , अ‍ॅडव्हेंचर (Adventure) आणि अ‍ॅकॉम्पलिश्ड (Accomplished) पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

टाटा पंच CNG व्हर्जनची किंमत त्याच मॉडेलच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा १.६१ लाख रुपये जास्त आहे. विशेष म्हणजे टाटा हे मॉडेल टॉप क्रिएटिव्ह ट्रिममध्ये देत नाही. याशिवाय टाटा मोटर्स वैकल्पिक पॅकेजसह पंच iCNG च्या अ‍ॅडव्हेंचर (Adventure) आणि अ‍ॅकॉम्पलिश्ड (Accomplished) ट्रीम्स ऑफर करेल. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
savita malpekar marathi actress talks about groupism
“त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 5 August: कच्चा तेलाच्या किमतीमध्ये घसरण, वाचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Tata Punch iCNG: स्पेसिफिकेशन्स

टाटा पंच ICNG मध्ये या मॉडेलच्या पेट्रोल व्हर्जनप्रमाणेच १.२ लिटरचे तीन सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. सीएनजी मोडमध्ये हे ७२.४ बीएचपी पॉवर आणि १०३ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. पेट्रोल इंजिनमध्ये हे इंजिन ८५ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते.

टाटाच्या लाइनपमध्ये अन्य सीएनजी मॉडेलप्रमाणेच पंच ICNG ला देखील प्रगत अशा ECU सीएनजी मोडमध्ये सुरूकेले जाऊ शकते. यात अल्ट्रोज ICNG सारखे ट्वीन सिलेंडर देण्यात आले आहे. जे एक मोठ्या ६० लिटर सीएनजी टॅंकला दोन समान भागात विभाजित करण्याची परवानगी देते. या दोन सिलेंडरमध्ये बूट फ्लोअरच्या खाली बसवण्यात आले आहे. त्यामुळे बूटसाठी अधिक स्टोरेज स्पेस मोकळी होते.

हेही वाचा : ओडीसीला बड-ई कडून मिळाली इलेक्ट्रिक स्‍कूटरच्या १०,००० युनिट्सची ऑर्डर

पंच iCNG मध्ये ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, हरमन ऑडिओ सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर्स, अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट,१६ इंचाचे कट अलॉय या फीचर्सचा समावेश आहे.

किंमत

Image Credit-Financial Express

टाटा मोटर्सने आपली बहुप्रतीक्षित अशी CNG कार भारतात लॉन्चकेली आहे. भारतात टाटा पंच iCNG हे मॉडेल कंपनीने ७.१०लाख (एक्स शोरूम) रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.