भारतीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलच्या चढ्या किंमतीमुळे CNG पॉवरट्रेन लोकप्रिय होत आहे. आतापर्यंत मारूती सुझुकी सीएनजी सेगगमेंटमध्ये आघाडीवर होती. कारण त्यांच्याकडे सीएनजी वाहनांची सर्वात मोठी लाइनअप आहे. मात्र आता टाटा मोटर्सनेही सीएनजी वाहने देण्यास सुरू केल्याने स्पर्धा हळूहळू वाढत आहे. टाटा मोटर्स सध्या Altroz, Tigor आणि Tiago हे सीएनजी मॉडेल्स विकत आहे. . टाटाच्या iCNG वाहनांच्या रेंजमध्ये सामील होणारे नवीनतम वाहन पंच आहे जे ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रथम प्रदर्शित करण्यात आले होते. येथे पाच गोष्टी आहेत ज्या टाटा पंच बद्दल माहित असणे आवश्यक आहे.

Tata Motors ही देशातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता टाटा मोटर्सने बहुप्रतीक्षित अशी आपली टाटा पंच CNG कार लॉन्च केलीआहे. भारतीय बाजारात टाटा ICNG लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे टाटाच्या लाइनअपमध्ये टिआगो, Tigor आणि अल्ट्रोजनंतरचे चौथे सीएनजी मॉडेल बनले आहे. खरेदीदारांसाठी टाटा पंचचे सीएनजी व्हर्जन प्युअर(Pure , अ‍ॅडव्हेंचर (Adventure) आणि अ‍ॅकॉम्पलिश्ड (Accomplished) पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा

हेही वाचा : अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले,Tata ने नव्या अवतारामध्ये लॉन्च केली ‘ही’ कार; किंमत फक्त…

Tata Punch iCNG: पॉवरट्रेन

टाटा मोटर्स पंचसाठी तेच नॅचरली एस्पिरेटेड तीन सिलेंडरचे १,२ लिटरचे इंजिन वापरत आहे. जे टाटाच्या इतर वाहनांसाठी वापरले जात आहे. हे इंजिन सीएनजीवर चालत असताना ७२.३९ बीएचपी पॉवर आणि १०३ एनएम टॉर्क जनरेट करते. तर पेट्रोलवर चालत असताना ८४.८२ बीएचपी आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. पंच iCNG फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल.

Tata Punch iCNG: ट्वीन सिलेंडर टेक्नॉलॉजी

सीएनजी वाहनांसाठी सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे सीएनजी टॅंक गाडीतील बूट स्पेसमधील जागा व्यापते. मात्र ही समस्या टाटा मोटर्सने बऱ्याच प्रमाणात सोडवली आहे. यासाठी ते त्यांचे ट्वीन सिलेंडर टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. जे एका मोठ्या सिलेंडरऐवजी दोन सिलेंडरचा वापर करतात. यामुळे प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा निर्माण होते.

Tata Punch iCNG: सुरक्षा

टाटा मोटर्सने पंच iCNG च्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले आहे. यात एक मायक्रोस्वीच येतो जे इंधन भरत असताना कार बंद ठेवते. अधिक सुरक्षा देण्यासाठी रिअर डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच सीएनजी टाक्यांसाठी ६-पॉईंट माऊंटिंग सिस्टीम अतिरिक्त रिअर क्रॅश सुरक्षा प्रदान करते.

हेही वाचा : TVS ची इलेक्ट्रिक टू-व्हीलर गाडीची पहिली झलक आली समोर, ‘या’ दिवशी होऊ शकते लॉन्च

Tata Punch iCNG: फीचर्स

पंच iCNG मध्ये व्हॉईस-असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, यूएसबी टाइप-सी चार्जर, फ्रंट सीट आर्मरेस्ट, शार्क-फिन अँटेना, ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्स, रेन-सेन्सिंग वायपर आणि Android Auto आणि Apple Carplay कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही सपोर्ट करणारी Harman ची इन्फोटेनमेंट सिस्टम असे फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत.

Tata Punch iCNG: व्हेरिएंट्स आणि किंमती

पंच iCNG हे मॉडेल तीन व्हेरिएंटमध्ये ऑफर केले जाते. खरेदीदारांसाठी टाटा पंचचे सीएनजी व्हर्जन प्युअर(Pure , अ‍ॅडव्हेंचर (Adventure) आणि अ‍ॅकॉम्पलिश्ड (Accomplished) पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.पंच iCNG ची किंमत ७.१० लाखांपासून सुरू होतात आणि ९.६८ लाखांपर्यंत जातात. या दोन्ही किंमती एक्सशोरूम किंमती आहेत.

Story img Loader