Tata Motors First Automatic CNG Car: टाटा मोटर्सने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार देशात लाँच केली आहे. टाटाने ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन तंत्रज्ञानासह भारतात आपली पहिली CNG कार दाखल केली आहे. कंपनीने CNG सह Tiago आणि Tigor iCNG AMT मॉडेल सादर केले आहेत. यासाठी कंपनीने बुकिंग सुरू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकारांमध्ये सीएनजीचा पर्याय उपलब्ध

माहितीनुसार, नवीन Tiago iCNG AMT तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे जसे की, XTA CNG, XZA+ CNG, आणि XZA NRG, तर Tigor iCNG AMT दोन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. Tiago CNG आणि Tigor CNG. या ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या देशातील पहिल्या सीएनजी कार बनल्या आहेत.

ट्विन सिलिंडर तंत्रज्ञानाचा वापर

या दोन्ही कार ट्विन-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत, कंपनी यात अतिरिक्त बूट स्पेस देखील देत आहे. कार पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये स्विच करण्यासाठी प्रगत ECU सह सुसज्ज आहेत आणि ग्राहक कार थेट सीएनजी मोडमध्ये सुरू करु शकतात. सिक्युरिटी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात एक मायक्रो स्विच देण्यात आला आहे जो इंधन भरताना कार बंद करतो.

(हे ही वाचा : Ertiga ला तगडं आव्हान देणाऱ्या ‘या’ ८ सीटर MPV कारला ग्राहकांची मोठी मागणी, वेटिंग पीरियड पोहोचला ७ महिन्यांवर )

याशिवाय, कारमध्ये थर्मल इंसिडेंट  प्रोटेक्शन, आयसीएनजी किटमध्ये प्रगत सामग्री आहे ज्यामुळे गॅस गळती मोठ्या प्रमाणात कमी होते. याशिवाय, कारमध्ये गॅस लीक डिटेक्शन फीचर देखील आहे जे अशा परिस्थितीत कारला पेट्रोल मोडवर स्विच करते. iCNG AMT कार १.२L रेव्होट्रॉन इंजिनने सुसज्ज आहेत. याशिवाय टाटा मोटर्सने या मॉडेल्ससाठी नवीन रंग पर्यायही सादर केले आहेत. सध्या हे मॉडेल ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.टाटा कारमध्ये स्वीप्टबॅक प्रोजेक्टर हेडलाइट्स, स्लीक ग्रिल, ऑटो-फोल्डिंग ORVMs, एन्व्हलपिंग टेललाइट्स आणि टू-टोन अलॉय व्हील यांसारखे फीचर्स मिळतात.

टाटा मोटर्स सीएनजी ऑटोमॅटिक कारच्या नव्या किमती अद्याप समोर आल्या नाहीत. Tata Motors च्या Tiago CNG आणि Tigo CNG या दोन्ही कार टाटा मोटर्सच्‍या अधिकृत डीलरशिपद्वारे २१ हजार रुपयात बुक करू शकता. 

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata moters company has opened the bookings for both the tiago icng amt and tigor icng amt pdb