वाहन क्षेत्रात कार निर्मात्यांनी जुलै महिन्यात त्यांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक ऑफर आणि सूट देण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून ग्राहकांची संख्या वाढवता येईल. टाटा मोटर्स या महिन्यात आपल्या कारवर सूट देणारी पहिली कंपनी ठरली आहे, जी आपल्या निवडक कारवर आकर्षक सूट देत आहे. कंपनीने जारी केलेली ही सवलत SUV कारच्या हॅचबॅकवर उपलब्ध आहे.

कंपनीने जारी केलेली ही सवलत ३१ जुलैपर्यंत वैध आहे, परंतु ग्राहकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन कंपनी ही ऑफर आणखी वाढवू शकते. Tata Motors कडून या जुलैच्या सवलतीमध्ये कॅश डिस्काउंट व्यतिरिक्त एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि इतर फायदे दिले जात आहेत.

जर तुम्ही देखील टाटा मोटर्सची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर येथे जाणून घ्या कंपनी त्यांच्या कोणत्या कारवर किती सूट देत आहे.

Tata Tiago: टाटा टियागो ही कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक आहे, जी खरेदी केल्यावर तुम्हाला १८,००० रुपयांची सूट मिळेल. सवलतीमध्ये १०,००० रुपयांची रोख सवलत, ३००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि टाटा मोटर्सचे कर्मचारी असलेल्यांसाठी ४००० रुपयांची अतिरिक्त सवलत समाविष्ट आहे.

ही १८ हजारांची सूट Tata Tiago च्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर उपलब्ध असेल, तर कंपनी XZ किंवा टॉप व्हेरिएंट विकत घेतल्यावर २८,००० रुपयांची सूट देत आहे.

आणखी वाचा : Yamaha YZF R15 V3 स्पोर्ट्स बाईक आता रेसिंग ब्लूसह मॅट ब्लॅक कलरमध्ये, किंमत जाणून घ्या

Tata Tigor: टाटा टिगोर ही सेडान सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे, ज्यावर तुम्हाला ती खरेदी केल्यास २३,००० रुपयांची सूट मिळणार आहे. या सवलतीमध्ये १० हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना १०,००० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

Tata Tigor वर २३,००० हजारांची सूट त्याच्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर दिली जात आहे, परंतु जर तुम्ही त्याचे XZ किंवा टॉप व्हेरिएंट घेतले तर ही सूट ३३,००० रुपये असेल.

Tata Nexon: Tata Nexon वर रु ८००० रूपयांची सूट आहे ज्यात ३००० रूपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि Tata Motors च्या कर्मचार्‍यांसाठी ५००० रूपयांचा समावेश आहे. पण जर तुम्ही त्याचे डिझेल व्हेरिएंट घेतले तर ही सूट १५ हजार रुपयांची आहे, ज्यामध्ये टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांसाठी १० हजारांची सूट आहे.

Tata Altroz: टाटा अल्ट्रोज​​चे पेट्रोल व्हेरिएंट विकत घेतल्यावर तुम्हाला ७५०० रुपयांची सूट मिळत आहे ज्यामध्ये टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांसाठी ७ हजारांची सूट आहे. त्याच्या डिझेल व्हेरिएंटवर १०,००० रुपयांची सूट दिली जाईल.

आणखी वाचा : वाहनांच्या टायर्सचा ‘हा’ नियम बदलला, येत्या १ ऑक्टोबरपासून होणार लागू

Tata harrier: तुम्ही टाटा हॅरियर एसयूवी खरेदी केल्यास तुम्हाला ४० हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल, याशिवाय टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना २५,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे ही एकूण सूट जोडल्यास ७० हजार रुपये येते.

Tata Safari: टाटा सफारी ही त्यांच्या कंपनीची प्रीमियम एसयूव्ही आहे, ज्याच्या खरेदीवर टाटा मोटर्स ४० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. या एक्सचेंज बोनसशिवाय या SUV वर इतर कोणतीही सूट मिळणार नाही.

Story img Loader