देशात सुरू झालेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने सप्टेंबर महिन्यात निवडक कारवर सूट जाहीर केली आहे. कंपनीने जारी केलेली डिस्काउंट ऑफर टाटा हॅरियर, सफारी, टियागो आणि टिगोर सारख्या कारवर उपलब्ध असेल.

या डिस्काउंट ऑफरमध्ये ग्राहकांना या कार खरेदीवर ४० हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि इतर फायदे समाविष्ट आहेत. टाटा मोटर्सची ही सूट ३० सप्टेंबरपर्यंत वैध आहे.

ऑफरचे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सची कोणती कार खरेदी करून किती पैसे मिळू शकतात, हे देखील तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

आणखी वाचा : HOP OXO इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये १५० किमी रेंजचा दावा, किंमत जाणून घ्या

Tata Harrier
कंपनी सप्टेंबरमध्ये टाटा हॅरियरच्या खरेदीवर ४० हजार रुपयांपर्यंत बचत देत आहे. या SUV वर मिळणाऱ्या या डिस्काउंटमध्ये ४० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय तुम्ही एक्सचेंज बोनसशिवाय ही SUV खरेदी केल्यास कंपनी ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.

Tata Safari
Tata Safaree ही एक प्रीमियम SUV आहे, ज्यावर कंपनी ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. कंपनी या SUV वर फक्त एक्सचेंज बोनस देत आहे, याशिवाय इतर कोणतीही सूट किंवा ऑफर दिली जात नाही.

आणखी वाचा : Hero HF Deluxe विकत घ्यायचीय? पण बजेट नाही, मग ही ऑफर एकदा वाचाच!

Tata Tigor CNG
टाटा टिगोर ही सेडान सेगमेंटची कार आहे आणि टाटा मोटर्स या कारवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या कारवर मिळणारी सूट १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस म्हणून दिली जात आहे. याशिवाय १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंटही दिला जात आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानमध्ये ‘या’ ५ भारतीय कारची चारपट किंमतीने होते विक्री, अल्टोची किंमत १७ लाखांपासून सुरू, कारण जाणून घ्या?

Tata Tiago
Tata Tiago ही हॅचबॅक सेगमेंटची कार असून कंपनी या कारवर २३ हजार हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या सवलतीमध्ये १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे.

(महत्त्वाची माहिती: टाटा मोटर्सच्या या सप्टेंबरमधील डिस्काउंट ऑफरमध्ये कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला किंवा तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्या आणि संपूर्ण तपशील घ्या. कारण ही सवलत देशातील राज्यानुसार बदलू शकते.)

Story img Loader