Tata Motors ही देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटाने काही दिवसांपासून आपली अनेक मॉडेल्स बाजारात लॉन्च केली आहेत. त्यामध्ये सीएनजी, EV आणि पेट्रोल-डिझेल अशा व्हेरिएंटमध्ये लॉन्च करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून टाटा मोटर्सच्या कार्सच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. टाटा मोटर्स कार्स लॉन्च करताना त्यामध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेत असते. येत्या पुढील काही महिन्यांमध्ये कंपनी अनेक कार्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
टाटाने आधीच Altorz CNG आणि Feciliated Harrier व Safari या मॉडेलचे बुकिंग सुरु केले आहे. अल्ट्रॉझ सीएनजी पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर सफारी आणि हॅरिअर या कार्स फेस्टिवल सीझनमध्ये लॉन्च केल्या जाऊ शकतात. त्यासह कंपनी टाटा अल्ट्रोझ रेसर एडिशन आणि टाटा पंच EV लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तर टाटा येत्या काही महिन्यात कोणत्या कार्स लॉन्च करणार आहे ते जाणून घेऊयात.
हेही वाचा : Sunroof असलेली कार विकत घेण्याचा विचार करताय, मग ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा..
Tata Altroz Racer
या वर्षी झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये टाटा अल्ट्रोझ रेसर एडिशचे सदारकरीण करण्यात आले आहोत. या कारचे व्हर्जन स्पोर्टीअर आणि अधिक शक्तिशाली असे आहे. यामध्ये १०.२५ इंचाचा टचस्क्रीन, व्हॉइस असिस्टंटसह एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इलेक्ट्रीकली ऍडजेस्टेबल सनरूफ देखील मिळते. यामध्ये १.२ लिटरचे , ३ सिलेंडर असलेलं टर्बो इंजिन मिळू शकते. जे १२० बीएचपी इतकी पॉवर व १७० एनएम इतके तर जनरेट करते. या इंजिनला ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे.
Tata Punch CNG
टाटा पंच हे मॉडेल सुद्धा ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अल्ट्रोझ सीएनजीसह सादर करण्यात आले होते. यामध्ये अल्ट्रोझ सीएनजी प्रमाणेच ट्वीन सिलेंडर CNG सेटअपसह १.२ लिटरचे ३ सिलेंडर असलेले पेट्रोल इंजिन मिळेल. याला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. सीएनजी व्हेरिएंटमध्ये हे मॉडेल ७७ बीएचपी पॉवर आणि ९७ एनएम टॉर्क जनरेट करते.
Altroz CNG
अल्ट्रोझ हॅचबॅकचे सीएनजी व्हेरिएंट हे XE, XM+, XZ आणि XZ+ या चार ट्रीम्समध्ये लॉन्च केले जाईल. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये १.२ लिटरचे ३ सिलेंडर असलेले पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. ज्यासह नवीन ट्वीन सिलेंडर CNG किट जोडले आहे. सीएनजी व्हेरिएंटमध्ये हे मोडले ७७ बीएचपी इतकी पॉवर आणि ९७ एनएम टॉर्क जनरेट करते. याला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सक्ससह जोडण्यात आले आहे. यामध्ये ३० लिटरचे दोन टॅंक देण्यात आले आहेत.
Tata Nexon facelift
Tata ची सर्वाधिक विक्री होणारी SUV Nexon मध्ये पुढील काही महिन्यात अपडेटेड फिचर बघायला मिळणार आहेत. या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीचे डिझाईन आणि इंटेरिअर हे र्व्ह कॉन्सेप्ट एसयूव्हीसारखेच बनवले जाईल. यामध्ये ग्राहकांना १.२ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल जे १२५ बीएचपी पॉवर आणि २२५ एनएम टॉर्क जनरेट करेल. तसेच १.५ लिटरचे डिझेल इंजिन देखील यामध्ये उपलब्ध असेल.
Tata Harrier/Safari facelift
अपडेटेड Tata Harrier आणि Tata Safari SUV या वर्षी फेस्टिवल सीझनच्या आधी लॉन्च होणार आहेत. दोन्ही मॉडेलमध्ये १०.२५ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यामध्ये नवीन १.५ लिटर , ४ सिलेंडर असलेले टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. जे १७० बीएचपी पॉवर आणि २८० एनएम टॉर्क जनरेट करते.
Tata Punch EV
टाटा पंच EV या वर्षाच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. ही इलेक्ट्रिक मायक्रो एसयूव्ही सिग्मा प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. Tigor EV सह पॉवरट्रेन यामध्ये आढळू शकते. ही EV अनेक प्रकारांमध्ये आणि बॅटरी पॅक पर्यायांमध्ये ऑफर केली जाऊ शकते.