Tata Motors Diwali Offer : सणावारांमध्ये जास्तीत जास्त कारांची विक्री व्हावी, म्हणून कार कंपनी ग्राहकांसाठी आकर्षक डिस्काउंट, नवनवीन ऑफर, डिल्स आणतात. अनेक ग्राहक या ऑफर्सची वाट बघतात आणि सणावारांमध्ये खरेदी करतात. टाटा मोटर्स ही त्यापैकी एक कंपनी आहे जी सणांच्या महिन्यात ग्राहकांसाठी हटके ऑफर्स आणत त्यांना खुश करते. यावर्षी टाटा मोटर्स २०२३ आणि २०२४ या दोन्ही वर्षाच्या मॉडेल्सवर आकर्षक सूट देत आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

टाटा मोटर्स दिवाळी सेल

टाटा टियागो (Tata Tiago) – टाटा मोटर्स आपली सर्वात मोठी गाडी टियागोच्या XE, XM आणि XTD ला सोडून सर्व व्हेरिएंटवर ३० हजार रुपयांची सूट देत आहे ज्यावर सध्या २० हजार रुपयांची सूट आहे. या डीलमध्ये पेट्रोल आणि CNG ट्रिम चा समावेश आहे.

टाटा अल्ट्रोज रेसर(Tata Altroz Racer) – टाटा मोटर्सची स्पोर्टी अल्ट्रोज़ रेसर ही अतिशय आकर्षित आहे पण या गाडीची हॅचबॅक विक्री अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे या गाडीवर ५० हजार रुपयांपर्यंत डील आहे, ज्यामध्ये एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट आणि अतिरिक्त सूट दिली आहे.

हेही वाचा : Ratan Tata Car Collection: सर्वसामान्यांचे कारचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या रतन टाटांना गाड्यांचे होते प्रचंड वेड; ‘नॅनो’ ते ‘फेरारी’ पर्यंतची यशोगाथा

टाटा पंच ( Tata PUNCH) – टाटा पंच ही एक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. याच्या पेट्रोल व्हर्जन वर २० हजार रुपयांपर्यंत सुट आहे की नकदी सूट आणि CNG वर जवळपास १५ हजार रुपयांची सूट दिली आहे.

MY2024 नेक्सन मॉडेल (Tata Nexon) – MY2024 नेक्सन च्या फियरलेस रेंज वर २० हजार रुपयांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत सूट आहे तर फ्लॅगशिप सफारीवर ५० हजार रुपयांपर्यंत सूट आहे.

याशिवाय टाटा मोटर्स त्यांच्या दोन फुल-साइज़ एसयूव्ही, हॅरियर आणि सफारीवर सर्वात जास्त १.३३ लाख रुपयांपर्यंत सूट ऑफर करत आहे. याशिवाय नेक्सन पेट्रोलसाठी ९५ हजार रुपये आणि डिझेल साठी ८५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. MY2023 पंच पेट्रोल आणि CNG वर अनुक्रमे १८,००० आणि १५,००० रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो.

हेही वाचा : Tata Nexon CNG vs Tata Punch CNG; कोणती कार आहे तुमच्यासाठी बेस्ट? किंमतीपासून फीर्चसपर्यंत, जाणून घ्या एका क्लिकवर

हॅचबॅकबाबतीत , टियागो पेट्रोल आणि CNG वर ९० हजार रुपये आणि ८५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार. अल्ट्रोज़ पेट्रोल आणि डिझेल वर जवळपास ७० हजार रुपये आणि सीएनजी ट्रिम वर ५५ हजार रुपये सूट दिली जात आहे.