Tata Motors Electric Car Discount Offers: सध्या देशभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्री, दसरा, दिवाळी असे एकामागोमाग एक सण सुरू होतील. या सणासुदीच्या हंगामात अनेक जण नवीन कार घेण्याचा विचार करतात. जर तुम्हीही नवी कोरी कार घेणार असाल तर थांबा! टाटा मोटर्स त्यांच्या काही लोकप्रिय इलेक्ट्रिक कार मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणावर सूट देणार आहे आणि या डिस्काउंटमुळे तुमची जवळजवळ तीन लाखांपर्यंत बचत होऊ शकते.

टाटा मोटर्सच्या या इलेक्ट्रिक कार मॉडेल्समध्ये Nexon EV, Punch EV आणि Tiago EV यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या किमतीत तब्बल तीन लाखांपर्यंत घट केली आहे. परंतु, Tigor EV आणि नव्याने लाँच झालेल्या Curvv EV साठी कोणत्याही सवलती उपलब्ध नाहीत. तसेच ही सवलत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उपलब्ध असणार आहे.

CNG car driver Take care important tips
CNG चे कारचालक आहात? ‘या’ महत्त्वाच्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या कारची काळजी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Bajaj Triumph New Speed 400
Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…; जाणून घ्या किंमत, फीचर्स
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
New Toll Tax Rules : महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम
Bestune Xiaoma Mini EV
Bestune Xiaoma Small EV बाजारात घालणार धुमाकूळ! एकदा चार्ज केल्यानंतर १२०० किमीपर्यंत धावते, किंमत फक्त….

हेही वाचा… New Hero Destini 125 vs TVS Jupiter 110: दोन्ही स्कूटर्स झाल्या नव्या फिचर्स अन् डिझाईनस लॉंच! कोणती स्कूटर ठरणार वरचढ? घ्या जाणून…

Tata EV च्या किमतीत घट : तुम्ही किती बचत करू शकता

Nexon EV च्या किमतीत सर्वात लक्षणीय घट होत आहे. सुधारित किंमत आता रु. १२.४९ लाख ते रु. १६.२९ लाख आहे, पण ही किंमत प्रत्येक व्हेरियंटवर अवलंबून आहे. ही किंमत टॉप-स्पेसिफेकशन मॉडेल्ससाठी रु. तीन लाखांपर्यंत घट दर्शवते, तर एंट्री-लेव्हल व्हेरिएंटसाठी रु. दोन लाखांपर्यंत घट दर्शवते. या सणाच्या ऑफरपूर्वी, Nexon EV ची किंमत १४.४९ लाख ते १९.२९ लाख रुपये इतकी होती.

दुसरीकडे, Punch EV ला सणासुदीच्या किमती कपातीचाही फायदा होत आहे. Punch EV ची किंमत १०.९९ लाख रुपयांवरून घसरली आहे, तर याची नवीन किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू झाली आहे. तसेच टॉप-स्पेसिफिकेशन व्हेरिएंटची किंमत आता १.२ लाख रुपयांनी कमी होऊन १३.७९ लाख रुपये इतकी झाली आहे.

हेही वाचा… कार सुरू करण्याआधी फक्त ४० सेकंदापूर्वी करा हे काम; इंजिनला होईल फायदा

Tiago EV च्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटची किंमत जशाच तशी म्हणजेच ७.९९ लाख रुपये इतकी आहे, तर याच्याच टॉप-स्पेसिफिकेशन व्हर्जनमध्ये ४०,००० रुपयांची घट झाली आहे, ज्यामुळे त्याची नवीन किंमत आता १०.९९ लाख रुपये इतकी झाली आहे.

अतिरिक्त उत्सव ऑफर : फ्री चार्जिंग

या कमी झालेल्या किमतींसह टाटा मोटर्स या कालावधीत ईव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी भारतभरातील ५,५०० हून अधिक टाटा पॉवर चार्जिंग स्टेशनवर सहा महिन्यांची मोफत चार्जिंग ऑफर देत आहे.