टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या एसयूव्हींचे नवीन स्पेशल व्हेरिएंट लाँच करण्याची योजना बनवली आहे. टाटा मोटर्स आता आपल्या लोकप्रिय हॅरियर एसयूव्हीची स्पेशल एडिशन आणण्याच्या तयारीत असून कंपनीने नुकताच नवीन एसयूव्ही कारचा एक टीझर शेअर केला आहे. आगामी कार हॅरियर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आणि कंपनी अनेक नवीन फीचर्ससह ती आणणार आहे. या वर्षअखेरीस ते आणले जाईल, असे सांगितले जात आहे. कंपनी नवीन स्पेशल व्हेरिएंट्समध्ये केवळ कॉस्मेटिक बदल करणार नाही तर त्यामध्ये नवीन फीचर्स देखील दिले जातील. मात्र एसयूव्हीमध्ये मेकॅनिकल बदल केले जाणार नाहीत. असे सांगितले जात आहे.

कशी असेल नवी कार ?

आगामी हॅरियर स्पेशल एडिशन आतून बाहेरून लाइट ब्राउन थीममध्ये असेल. यात नवीन लोखंडी जाळी आणि स्किड प्लेट, १८-इंच अलॉय व्हील्स देखील मिळतील, ज्याला काळ्या रंगात पेंट केले जाईल. दुसरीकडे, टीझरमध्ये ‘साहस’ आणि ‘मोहिमा’ सारखे शब्द वापरले गेले आहेत, जे सफारी अॅडव्हेंचर पर्सोनामध्ये दिसणारी हलकी राखाडी थीम दर्शवेल अशी अपेक्षा आहे.

आणखी वाचा : Cars Price Hike: अर्रर्र! स्कोडाच्या ‘या’ लोकप्रिय कारच्या किमतीत वाढ; पहा नवीन किंमत

हॅरियर स्पेशल एडिशन देखील नवीनतम वैशिष्ट्यांसह येण्याची अपेक्षा आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह ८.८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सर्व रांगांसाठी A आणि C-प्रकारचे USB पोर्ट, हवेशीर फ्रंट सीट्स आणि एअर प्युरिफायर यांसारखी वैशिष्ट्ये पॅक करणे अपेक्षित आहे. याशिवाय पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, रेन सेन्सिंग वायपर्स देखील पाहता येतील.

किंमत काय असेल ?

सध्या, हॅरियर १४.७० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असून त्याच वेळी, त्याची विशेष आवृत्ती ५०,००० अधिक किमतीत आणली जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader