भारतीय बाजारात अनेक कंपन्यांच्या हॅचबॅक कारचे अनेक मॉडेल उपलब्ध आहेत. त्यामध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki), होंडा (Honda), टाटा मोटर्स (Tata Motors) आणि अन्य कंपन्या यांच्या हॅचबॅक कार आपल्याला पाहायला मिळतात. या कंपन्या आपल्या गाड्यांचे डिझाईन, किंमत आणि फीचर्स यामुळे बाजारात आपली पकड राखून आहेत. यामध्ये टाटा मोटर्सच्या Tata Altroz च्या फीचर्स , किंमतीमुळे या गाडीने ऑटो क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे.
तुम्ही जर या नवीन वर्षात एखादी नवीन प्रीमियम हॅचबॅक कार विचार करत असाल तर, टाटा अल्ट्रोझ या गाडीचा विचार करू शकता. ही कार 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह उपलब्ध आहे. एका सोप्या फायनान्स प्लॅनसह तुम्हाला ही कार फक्त ५० हजारात खरेदी करता येणार आहे.
Tata Altroz किंमत
Tata Altroz XE हे अल्ट्रोझचे बेस मॉडेल आहे. बेस मॉडेलची किंमत ६,३४,९०० रुपये आहे. ऑन रोड या मॉडेलची किंमत ही ७,३९,५५ रुपये इतकी आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ७.३९ रुपये असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल तर तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे ५० हजार रुपये भरून ही कार घरी घेऊन जाऊ शकता. फायनान्स प्लॅन करणयासाठी तुमच्याकडे ५०,००० रुपये असल्यास बँक तुम्हाला या गाडीसाठी ९.८ टक्के व्याज दराने ६,७७,४९९ रुपयांचे कर्ज देऊ शकते.
(हे ही वाचा : ग्राहकांची मज्जाच मजा! बाईकच्या किमतीत घरी आणा मारुतीची सर्वात सुरक्षित कार, पाहा डिटेल्स )
किती असेल ईएमआय आणि डाऊनपेमेंट ?
एकदा Tata Altroz या गादीवर तुम्हाला कर्ज मिळाले की तुम्हाला गाडी घेण्यासाठी ५०,००० रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागणार आहे. तसेच पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला १४,३२७ रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
अल्ट्रोझ ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये १८.५३ किलोमीटरचे मायलेट देते असा टाटा मोटर्सचा दावा आहे. Tata Altroz मध्ये कंपनीने ११९९ सीसीचे इंजिन दिले आहे . ज्यात ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. हे इंजिन ८४.८८ बीएचपी पॉवरचे आहे. यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखे फीचर्स या गाडीमध्ये येतात.