टाटा मोटर्स ही देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी आहे. उत्तर प्रदेशमधील ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सुद्धा टाटा मोटर्सने नवीन काही इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या. त्या शो मध्ये सर्व कंपन्यांचा कल हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांवरच होता. टाटा मोटर्सने Nexon EV Max XM हे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच केले आहे. नवीन लाँच झालेली XM ही Nexon EV Max सिरीजमधील सर्वात परवडणारे मॉडेल आहे.
Tata Nexon EV Max XM
बाकीच्या Nexon EV Max सारखेच एक्सएम मॉडेलमध्ये ४०.५ क्षमतेची बॅटरी येते. याचे चार्जिंग दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ३.३ kW AC वॉल बॉक्स आणि ७.२ kW AC चा फास्ट चार्जर येतो. Nexon EV Max XM चे एकूण आउटपुट हे १४१ बीएचपी इतके आहे.
बाकीच्या Nexon EV Max सारखेच एक्सएम मॉडेलमध्ये ४०.५ क्षमतेची बॅटरी येते. याचे चार्जिंग दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ३.३ kW AC वॉल बॉक्स आणि ७.२ kW AC चा फास्ट चार्जर येतो. Nexon EV Max XM चे एकूण आउटपुट हे १४१ बीएचपी इतके आहे. सेफ्टीच्या दृष्टीने Nexon EV Max XM मध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) व चारही ब्रेक हे डिस्क ब्रेक टाईपमध्ये येतात.
काय असणार किंमत ?
टाटा मोटर्सने Nexon EV Max XM लाँच केली असून याची किंमत १६.४९(Ex-showroom price) लाख इतकी आहे. तसेच ही कार एकदा चार्ज केली की, ४५३ किमी धावेल असा कंपनीने दावा केला आहे.