TATA Red Dark Edition: टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपल्या SUV लाइन-अपची Red Dark एडिशन सादर केली आहे. Tata Nexon, Harrier आणि Safari च्या नवीन रेड डार्क एडिशन भारतात लाँच केल्या गेल्या आहेत. या स्पेशल एडिशन SUV अनेक नवीन वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आले आहे, ज्यात कनेक्टेड कार टेक आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) सह मोठ्या टचस्क्रीन सिस्टमचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark आवृत्ती किंमत

नवीन टाटा नेक्सॉन रेड डार्क एडिशनची किंमत १२.३५ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टाटा हॅरियर आणि सफारीच्या रेड डार्क एडिशनची किंमत २१.७७ लाख आणि २२.६१ लाख रुपये आहे, सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark edition बुकिंग प्रक्रिया

Tata Motors च्या Red Edition अंतर्गत ऑफर केलेले Nexon, Harrier आणि Safari खरेदी करण्यासाठी, ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन ऑफलाइन देखील बुक करू शकतात. या तीन आवृत्त्यांच्या बुकिंगसाठी कंपनीने ५०,००० रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे.

(हे ही वाचा : फीचर्समध्ये तडजोड नाही! मारुतीच्या सर्वात स्वस्त 7-सीटर कारने इतिहास रचला, किंमत ५.२५ लाख )

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark आवृत्तीमध्ये नवीन काय आहे?

या Tata SUV च्या डार्क रेड एडिशनमध्ये ओबेरॉन ब्लॅक शेड आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Harrier आणि Safari ला कनेक्टेड कार टेकसह एक मोठी १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७.०-इंच डिजिटल TFT क्लस्टर, सहा एअरबॅग्ज, एक ३६०-डिग्री कॅमेरा, ADAS इत्यादी देखील मिळतात. याशिवाय, आता त्यांना ३ वर्षे किंवा १ लाख किलोमीटरची मानक वॉरंटी मिळत आहे.

टाटा नेक्सॉन, हॅरियर, सफारी रेड डार्क एडिशन इंजिन आणि ट्रान्समिशन

टाटा मोटर्सने या तीन एसयूव्हीचे इंजिन पूर्वीप्रमाणेच ठेवले आहेत परंतु ही इंजिने आरडीई आणि ई20 इंधनाने बनवली आहेत. Harrier आणि Safari Red Dark Edition ला समान १७० bhp २.०-लिटर डिझेल इंजिन ६-स्पीड MT/AT सोबत मिळते. दुसरीकडे, Tata Nexon मध्ये ११८bhp १.२-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि १०८bhp १.२-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६-स्पीड AMT ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors has launched the dark edition of its three popular suvs nexon harrier and safari pdb