Tata Nexon EV Max Dark Edition: दोन विश्वांच्या सर्वोत्तम बाबींना एकत्र आणत टाटा मोटर्सने या भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाइल उत्पादक आणि भारतातील ईव्ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने DARK टू द मॅक्ससह भारतातील लोकप्रिय ईव्ही DARK अवतारामध्ये लाँच केली.
उच्च दर्जाच्या हाय टेक इन्फोटेन्मेंट अपग्रेडसह सुधारित नेक्सॉन ईव्ही मॅक्स DARK ही सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त नेक्सॉन लाइन अपमधील पहिली वेईकल असेल, जसे हार्मनची २६.०३ सेमी (१०.२५ इंच) टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, हाय रिझॉल्यूशन (१९२०X७२०) हाय डेफिनिशन (एचडी) डिस्प्लेसह स्लिक रिस्पॉन्स, वायफायवर अँड्रॉईड ऑटो™ व अॅप्पल कारप्ले™, हाय डेफिनिशन रिअर व्ह्यू कॅमेरा, एन्हान्स्ड ऑडीओ परफॉर्मन्ससह शार्प नोट्स व विस्तारित बास परफॉर्मन्स, ६ प्रादेशिक भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी) वॉईस असिस्टण्ट आणि नवीन युजर इंटरफेस (यूआय).
या नवीन लाँचमध्ये DARK रेंजचे एक्स्टीरिअर व इंटीरिअर हे खास आकर्षण असतील. सिग्नेचर मिडनाइट ब्लॅक कलर्ड बॉडीला साजेसे स्टायलिश चारकोल ग्रे अलॉई व्हील्स, सॅटिन ब्लॅक ह्युमॅनिटी लाइन, प्रोजेक्टर हेडलॅम्प्ससह ट्रा-अॅरो डीआरएल, ट्रा-अॅरो सिग्नेचर एलईडी टेल लॅम्प्स, फेण्डरवर एक्सक्लुसिव्ह #DARK मास्कट, एक्स्टीरिअरवर शार्क फिन अॅण्टेना व रूफ रेल्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये असतील, ज्यामधून कारचा एकूण आकर्षक स्टान्स वाढेल. इंटीरिअर डार्क-थीम्ड इंटीरिअर पॅक, ज्वेल्ड कंट्रोल नॉब, ग्लॉसी पियानो ब्लॅक डॅशबोर्डसह सिग्नेचर ट्राय-अॅरो पॅटर्न, डार्क-थीम्ड लेदरेट डोअर ट्रिम्ससह ट्राय-अॅरो पर्फोरेशन्स, डार्क-थीम्ड लेदरेट सीट अपहोल्स्टरीसह ट्राय-अॅरो पर्फोरेशन्स व ईव्ही ब्ल्यू हायलाइट स्टिचेस आणि लेदरेट-रॅप्ड स्टिअरिंग व्हीलसह ईव्ही ब्ल्यू टिचेस अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह #DARK तत्त्वांशी पूरक असेल.
(हे ही वाचा : Maruti ला बसला धक्का! ‘ही’ सेडान कार बाजारात पडली मागे, केवळ ३०० लोकांनी केली खरेदी )
या लाँचबाबत बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, ‘‘नेक्सॉन ईव्ही ही भारतातील पहिल्या क्रमांकाची ईव्ही आहे आणि अल्पावधीत ५०,००० हून अधिक ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरण्यासोबत त्यांनी या ईव्हीवर विश्वास दाखवला आहे, ज्यामुळे ही वेईकल भारतातील ईव्ही क्रांतीची ध्वजवाहक बनली आहे. तसेच DARK रेंजने देखील ग्राहकांमध्ये पसंतीची निवड बनत आपली छाप पाडली आहे. DARK चे यश आणि नेक्सॉन ईव्ही मॅक्सच्या लोकप्रियतेसह आम्हाला वाटले की, या दोन्ही बाबींचे संयोजन करत DARK टू मॅक्सला चालना देणारे हे नवीन अवतार ग्राहकांसाठी सादर करायची हीच योग्य वेळ आहे.’’
तसेच नेक्सॉन ईव्ही मॅक्स DARK अनेक इच्छित वैशिष्ट्यांसह येते. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड, फ्रण्ट लेदरेट वेण्टिलेटेड सीट्स, एअर प्युरिफायरसह एक्यूआय डिस्प्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, क्रूझ कंट्रोल, ऑटो डिमिंग आयआरव्हीएम, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर, फुली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, रिअर एसी वेण्ट्स, स्मार्ट की सह पुश बटन स्टार्ट/स्टॉप (पीईपीएस), इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओआरव्हीएमएससह ऑटो फोल्ड, रिअर वायपर वॉशर व डिफॉगर, ४ स्पीकर + ४ ट्विटर्स, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स आणि १७.७८ सेमी (७ इंच) टीएफटी डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह फुल ग्राफिक डिस्प्ले ही काही नवीन सुधारित वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे या कारला आरामदायीपणा व सोयीसुविधेच्या बाबतीत उच्च रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये सर्व सुरक्षितता व कनेक्टेड वैशिष्ट्यांसह उच्चस्तरीय मॉडेलची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ही कार लक्षवेधक ऑफरिंग आहे.
किंमत
त्याच्या एक्सझेड प्लस लक्स व्हेरियंट्सची किंमत १९.०४ लाख रुपये आहे आणि एक्सझेड प्लस लक्सची ७.२ किलोव्हॅट एसी फास्ट चार्जरसहित येणाऱ्या गाडीची किंमत १९.५४ लाख रुपये आहे.