Tata Cars Offers: या नवीन वर्षात तुम्हाला नवीन कार खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. कारण या महिन्यात अनेक कार उत्पादक २०२२ मॉडेलच्या न विकल्या गेलेल्या कारवर भरघोस सूट देत आहेत. यातच आता देशातली प्रमुख वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या SUV वर तब्बल १.२५ लाखांची मोठी सूट देऊन सर्वांना चकितच केले आहे.
टाटा मोटर्सने ‘या’ कारवर दिली ऑफ
कंपनीने SUV Harrier आणि Safari वर ही ऑफर दिली आहे. प्रसिद्ध कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स लवकरच हॅरियर आणि सफारी या दोन्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल आणणार असून त्यामुळे लोक SUV Harrier आणि Safari या जुन्या मॉडेलकडे पाठ फिरवतील, या कारणाने या दोन्ही SUV ची लवकरात लवकर विक्री व्हावी म्हणून कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे.
(हे ही वाचा : १०० किमी रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर FREE मध्ये बुक करा, टॉप स्पीडही आहे जबरदस्त )
‘या’ गाड्यांवर मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा डिस्काउंट
टाटा आपल्या दोन्ही कारवर १.२५ लाख रुपयांची सूट देत आहे. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये या सवलतीच्या रकमेत काही बदल होऊ शकतात. वास्तविक ही सवलत २०२२ उत्पादित मॉडेल्सवर दिली जात आहे.