देशात सर्वाधिक कार विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्‍टोबर २०२३ मध्ये टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकावर राहिली. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५,२२० कारच्या तुलनेत ४८,३४३ कार विकल्या गेल्या. यानुसार, कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, वार्षिक आधारावर टाटाच्या चार कारच्या विक्रीत घट झाली. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कार…

टाटा टियागो विक्री

टाटा मोटर्सने ऑक्टोबर २०२३ मध्ये टियागोच्या ५ हजार ३५६ युनिट्सची विक्री केली तर ऑक्टोबर २०२२ मध्ये ७ हजार १८७ युनिट्सची विक्री झाली. याचा अर्थ वार्षिक आधारावर विक्री २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. एवढेच नाही तर सप्टेंबर २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या ६ हजार ७८९ युनिटच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये त्याची विक्री २१ टक्क्यांनी कमी झाली.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
China Accident
China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ

(हे ही वाचा : Kia ची सर्वात जास्त विकणारी SUV झाली स्वस्त, कारच्या किमतीत कंपनीने केली कपात; आता मोजा ‘इतके’ रुपये! )

टाटा टिगोर विक्री

टाटा मोटर्सच्या एकमेव सेडान टिगोरच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. त्याची विक्री वार्षिक आधारावर ६१ टक्क्यांनी कमी झाली आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२३ मध्ये टिगोरच्या एकूण १ हजार ५६३ युनिट्सची विक्री केली आहे. तर ऑक्टोबर २०२२ मध्ये एकूण ४,००१ युनिट्सची विक्री झाली.

हॅरियर आणि सफारी

टाटाच्या प्रमुख एसयूव्ही हॅरियर आणि सफारीच्या विक्रीतही घट झाली आहे. वार्षिक आधारावर त्यांची विक्री अनुक्रमे ३१ टक्के आणि २३ टक्क्यांनी घसरली. टाटाने ऑक्टोबर २०२३ मध्ये हॅरियरच्या एकूण १ हजार ८९६ युनिट्सची विक्री केली तर गेल्या वर्षी (२०२२) ऑक्टोबरमध्ये हा आकडा २ हजार ७६२ युनिट्स होता.

सफारीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा ने गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये सफारीच्या एकूण १,३४० युनिट्सची विक्री केली आहे, तर ऑक्टोबर २०२२ मध्ये एकूण १,७५१ युनिट्सची विक्री झाली आहे. याचा अर्थ विक्रीत २३ टक्क्यांनी घट झाली आहे.