Tata Motors Car Sales: टाटा मोटर्सने मार्च महिन्यात ४४,०४७ कार विकल्या आहेत. यासह टाटा मोटर्स देशातील तिसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी बनली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील कार विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर असून ह्युंदाई दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा मोटर्सकडे वेगवेगळ्या किमती असलेल्या अनेक गाड्या आहेत, परंतु त्याच्या तीन कार सर्वाधिक पसंत केल्या जात आहेत. चला तर पाहूया कोणत्या आहेत कार…
टाटाच्या ‘या’ कारच्या मागे लागले भारतीय
Tata Nexon
टाटा नेक्सॉन ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. मार्चमध्ये एकूण १४,७६९ युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नेक्सॉनच्या १४,३१५ युनिट्सची विक्री झाली होती, त्या तुलनेत त्याच्या विक्रीत ३ टक्के वाढ झाली होती. ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. मात्र, फेब्रुवारीनंतर आता मार्चमध्येही मारुती ब्रेझाने त्याला मागे टाकले आहे.
(हे ही वाचा: टाटाचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘या’ तीन कारचे अपडेटेड मॉडेल्स, सीएनजी अन् ADAS फीचर्स सोबत… )
Tata Punch
मार्च २०२३ मध्ये, पंच मायक्रो SUV दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात त्याने १०,८९४ युनिट्सची विक्री केली आहे, जी फेब्रुवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १०,५२६ युनिट्सपेक्षा ३ टक्के अधिक आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे, ज्याने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. कंपनी लवकरच याला CNG अवतारातही आणणार आहे.
Tata Tiago
कंपनीची सर्वात स्वस्त कार Tata Tiago तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची किंमत ५.५४ लाख रुपयांपासून सुरू होते. गेल्या महिन्यात Tiago च्या एकूण ७,३६६ युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची ४,००२ युनिट्सची विक्री झाली, त्या तुलनेत त्याची विक्री ८४ टक्क्यांनी वाढली. टियागोने गेल्या महिन्यात कंपनीच्या विक्रीत वर्षभरातील सर्वोच्च वाढ नोंदवली.