Tata Motors भारतातातील एक लोकप्रिय आणि आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेटेड कार्स लॉन्च करत असते. तसेच यामध्ये कंपनी ग्राहकांच्या सुरक्षेची देखील तितकीच काळजी घेते. आता टाटा मोटर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काय आहे हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशातील लोकप्रिय आणि आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करणार आहे. ही नवीन दरवाढ १ मे २०२३ पासून लागू होणार आहे. प्रत्येक मॉडेल आणि त्यातील व्हेरिएंटनुसार किंमतीमध्ये वाढ केली जाणार आहे.

हेही वाचा : Car Price Hike: ग्राहकांसाठी मोठी बातमी! Honda आपल्या Amaze कारच्या किंमतीमध्ये करणार ‘इतक्या’ हजारांची वाढ

किंमती वाढवण्याचे कारण काय ?

टाटा मोटर्सने कारच्या किमतीत वाढ होण्यामागे वाढत्या इनपुट कॉस्टला जबाबदार धरले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून सरकारने लागू केलेल्या BS6 फेज 2 नियमामुळे कंपनीला आपल्या कारमध्ये काही बदल करावे लागले आहेत. याआधी कंपनी त्याचा संपूर्ण भार उचलत होती, मात्र आता त्याचा काही भाग ग्राहकांवर टाकला जाणार आहे.कंपनीच्या या निर्णयानंतर ५ लाखांपासून ते २५ लाखांपर्यत किंमती असणाऱ्या कार जशा Tiago, tigor आणि Altorz या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. यासोबतच पंच, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी या एसयूव्ही कारच्या किमतीही वाढणार आहेत.

याआधीही वाढल्या आहेत किंमती

याआधी २०२३ मध्ये, टाटा मोटर्सने जानेवारीमध्ये प्रथमच कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती, जी वाढ १ फेब्रुवारीपासून लागू झाली होती. त्या वेळी, कंपनीने नियामक बदल आणि इनपुट खर्च वाढण्याचे कारण दिले होते. याशिवाय टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. हे दर १ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत. अशाप्रकारे, २०२३ च्या पहिल्या चार महिन्यांत टाटा मोटर्सच्या वाहनांच्या किंमतीमध्ये ३ वेळा वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : Nissan Motor India ग्राहकांसाठी करणार ‘हा’ कॅम्प मोफत; जाणून घ्या काय असणार खास

१ एप्रिलपासून देशभरात BS6 फेज २ मानके लागू करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत सर्व कार उत्पादकांना त्यांच्या कारमध्ये अशी उपकरणे बसवावी लागतील. ज्यावरून गाडीमुळे किती प्रदूषण होत आहे हे कळू शकते. अशा परिस्थितीत आता कंपन्या त्यांचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यावेळी ग्राहकांना महागड्या कारसह महागड्या ईएमआयच्या दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आरबीआयच्या रेपो दरात सातत्याने वाढ होत असल्याने कार कर्ज महाग झाले आहे. अशा परिस्थितीत आता तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये १ मे २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या कारच्या किमतीत सरासरी ०.६ टक्क्यांची वाढ करणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कारच्या किमती वेगवेगळ्या मॉडेल्स आणि प्रकारांनुसार वाढवण्यात येणार आहेत.