Tata Motors हे देशातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशी वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सुद्धा आपल्या EV कार्स सादर केल्या होत्या. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि फीचर्ससह बाजारात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च करत असते.
टाटा मोटर्सने आपला फेब्रुवारी महिन्यचा रिपोर्ट जाहीर केला आहे. ज्यामध्ये देशांतर्गत कंपनीने गेल्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यापेक्षा तुलनेने यावर्षी ४ टक्के अधिक कर विकल्या आहेत. टाटा मोटर्सने गेल्या महिन्या एकूण ४२,८६२ प्रवासी कार्स विकल्या आहेत. मासिक विक्रीच्या बाबतीत टाटाची कामगिरी गेल्या महिन्यात थोडीशी निराशाजनक आहे. Tata Motors ने फेब्रुवारी 2022 मध्ये४७,९८७ कार्स विकल्या आहेत. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये तुलनेने कमी कार्स विकल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये 10.68% कमी कार विकल्या आहेत. या सगळ्यात चांगली बातमी म्हणजे टाटाच्या इलेक्ट्रिक कारच्या वार्षिक विक्रीत ८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा मोटर्सची फेब्रुवारी २०२३ मधील आकडेवारी जाणून घेऊयात.
टाटा मोटर्सच्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीच्या रिपोर्टवर नजर टाकल्यास हा आकडा ७८,००६ इतका आहे व त्यामध्ये ६ टक्क्यांनी वार्षिक वाढ झाली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये टाटा मोटर्सने जितकी वाहने विकली त्यामध्ये तब्बल १२.३ टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे . Tata Motors भारतीय बाजारपेठेत Nexon EV Prime, Nexon EV Max, Tigor EV आणि Tiago EV सारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार्सची विक्री करते. टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत प्रत्येक सेगमेंटच्या कार विकते, ज्यामध्ये Tiago आणि Ultros हॅचबॅक सेगमेंटमध्ये समाविष्ट आहेत. तर टाटा टागोर सेडान सेगमेंटमध्ये येते. टाटा नेक्सॉन ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.