टाटा मोटर्सने जून महिन्यात आपल्या पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमती वाढवल्या होत्या, त्यानंतर कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या किमतीही वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV आणि EV Max च्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने केलेली वाढ ६० हजार रुपयांपर्यंत आहे.
जर तुम्ही Tata Nexon EV किंवा Nexon EV Max खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या दोन इलेक्ट्रिक कारच्या कोणत्या मॉडेलवर किती वाढ झाली आहे ते येथे जाणून घ्या.
आणखी वाचा : २ लाख नव्हे केवळ ५० हजारात खरेदी करा KTM 200 Duke, जाणून घ्या ऑफर
कंपनीने Tata Nexon EV पाच व्हेरिएंटसह बाजारात लॉंच केली आहे. यामध्ये पहिला व्हेरिएंट XM, दुसरा XZ Plus, तिसरा XZ Plus Lux, चौथा Dark XZ Plus आणि पाचवा व्हेरिएंट Dark XZ Plus Love यांचा समावेश आहे.
Tata Motors ने Nexon EV च्या X-Z व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ४५ हजार रुपयांनी वाढवली आहे. तर XZ Plus च्या दुसऱ्या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ३५ हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
आणखी वाचा : केवळ ५० हजारात घरी घेऊन जा Royal Enfield Classic, जाणून घ्या ऑफर
तिसरा व्हेरिएंट XZ Plus ची एक्स शोरूम किंमत ३५ हजारांनी वाढवली आहे. त्याच्या चौथ्या व्हेरिएंट डार्क एक्स झेड प्लसच्या एक्स-शोरूम किंमतीत २० हजार रुपये आणि डार्क एक्स झेड प्लस लक्सच्या किंमतीत ३५ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
कंपनीने Tata Nexon EV Max चार व्हेरिएंटसह बाजारात लॉंच केले आहे. यामध्ये पहिला व्हेरिएंट XZ प्लस ३.३ kW, दुसरा XZ प्लस ७.२ kW, तिसरा XZ प्लस लक्स ३.३ kW, चौथा XZ प्लस लक्स ७.२ kW आहे. कंपनीने Tata Nexon च्या सर्व व्हेरिएंटच्या एक्स-शोरूम किमती ६०0 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत.
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये केवळ दोन कार विकत आहे, ज्यामध्ये पहिली इलेक्ट्रिक कार Tata Nexon आणि दुसरी कार Tata Tigor EV आहे.
कंपनीने वाढवलेल्या या किमतींमुळे Tata Nexon EV आणि Tata Nexon EV Max च्या किंमती देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलू शकतात. म्हणून कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी नवीन एक्स-शोरूम किमतींबद्दल संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट द्या.