Tata Nexon CNG And Punch CNG: टाटा मोटर्स आता सीएनजी पोर्टफोलिओ वाढवण्याच्या तयारीत आहे, ते सीएनजी सेगमेंटवरही लक्ष केंद्रित करत आहे. २०२३ मध्ये, टाटा आपली नेक्सॉन आणि पंच SUV सीएनजी किटसह लाँच करू शकते. कंपनीने जानेवारीमध्ये आयोजित ऑटो एक्सपो २०२३ मध्ये टाटा पंचची CNG आवृत्ती देखील प्रदर्शित केली आहे. टाटा नेक्सॉन सीएनजी थेट मारुती ब्रेझा सीएनजीशी टक्कर देईल आणि पंच सीएनजीही त्यासाठी अडचणी निर्माण करेल. ब्रेझा ही सब-४ मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली एसयूव्ही आहे, जी सीएनजी किटसह लाँच करण्यात आली आहे. Brezza CNG ची सुरुवातीची किंमत ९.१४ लाख रुपये आहे.
मारुतीने ब्रेझा सीएनजी बाजारात आणला आहे आणि तेथून टाटा त्याच्या दोन सीएनजी एसयूव्ही मॉडेल्स – नेक्सॉन सीएनजी आणि पंच सीएनजीसह त्याचा प्रतिकार करण्याची तयारी करत आहे. Nexon थेट Brezza शी स्पर्धा करते पण पंच ही अशा ग्राहकांची निवड होत आहे ज्यांना कमी बजेटमध्ये SUV चा अनुभव घ्यायचा आहे. हे Brezza आणि Nexon पेक्षा स्वस्त देखील आहे. त्याची सीएनजी आवृत्तीही या दोन्हीपेक्षा स्वस्त असेल. पंच सीएनजीचे मॉडेल जे ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते, अधिक बूट स्पेस देण्यासाठी ड्युअल सीएनजी सिलेंडर तंत्रज्ञान वापरले गेले.
(हे ही वाचा : नवे फीचर्स, टेक्नॉलॉजीवाल्या ‘या’ बाईकची Hero, Honda वर मात, किंमत ७० हजारांपेक्षाही कमी, मायलेज ७० किमी )
टाटा मोटर्सने नेक्सॉन सीएनजी सादर केला नाही परंतु, त्याची चाचणी सुरू आहे. नेक्सॉन सीएनजी १.२L टर्बो पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किटद्वारे समर्थित असणे अपेक्षित आहे. यामध्ये, इंजिनला ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. पेट्रोलवर, हे इंजिन १२०bhp/१७०Nm जनरेट करते परंतु CNG वर, पॉवर आउटपुट १०-१५bhp ने कमी होऊ शकते.
दुसरीकडे, पंच सीएनजी, १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे चालविले जाणे अपेक्षित आहे, जे सीएनजी किटसह देऊ केले जाऊ शकते. CNG वर, त्याचे पॉवर आउटपुट देखील इतर कारप्रमाणेच खाली येईल. हे फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केले जाण्याची अपेक्षा आहे.