Tata Motors January Discount : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टाटा मोटर्सने ग्राहकांना खुश केले आहे. त्यांनी त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयुव्ही टाटा पंच ईव्ही आणि टियागो ईव्हीवर डिस्काउंट ऑफर जारी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोन्ही ईव्ही वर मिळणारी सूटमध्ये यांच्या व्हेरिअंटवर आधारावर वेगवेगळी असणार पण त्यांना दोन भागामध्ये विभागले आहे. पहिला ग्रीन बोनस आणि दुसरा एक्सचेंज किंवा स्क्रॅपिंग बेनिफीट. टाटा पंच ईव्ही अन् टाटा टियागो ईव्हीवरील डिस्काउंट संदर्भात जाणून घेऊ या.

हेही वाचा : Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : कोणती दुचाकी आहे लयभारी? फिचर्सपासून किंमतीपर्यंत; जाणून घ्या, एका क्लिकवर

Tata Motors January discount: जानेवारी २०२५ साठी टाटा टियागो ईव्ही सूट

टाटा टियागो ईव्ही ३.३ kW XE व्हेरिअंटसाठी MY2024 स्टॉक वर ५० हजार रुपयांची सुट दिली आहे ज्याची किंमत ८.५७ लाख रुपये आहे. ३.३ kW XT MR व्हेरिअंटची किंमत ९.६१ लाख रुपये आहे, त्याच्यावर ७० हजार रुपयांची सूट आहे तर १०.६३ लाख रुपयांवर ३.३ KW XT LR व्हेरिअंटवर ८५ हजार रुपयांची सुट आहे.

११.१८ लाख रुपये किंमत असणाऱ्या टियागो ईव्ही ३.३ kW XZ+ आणि ११.७१ लाख रुपयांची किंमत असणाऱ्या टॉप-स्पेक XZ+ टेक लक्सवर जवळपास ६० हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. ७.२ kW फास्ट चार्जरबरोबर टियागो ईव्ही XZ+ आणि XZ+ टेक लक्स व्हेरिएंट वर सुद्धा ६० हजार रुपयांची सूट मिळत आहे. २०२५ च्या टियागो ईव्हीवर संपूर्ण लाइन-अप मध्ये ४० हजार रुपयांचा लाभ मिळत आहे.

हेही वाचा : TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

Tata Motors January discount: जानेवारी 2025 साठी टाटा पंच ईव्ही वर सूट

टाटा पंच ईव्ही ३.३ kW MR च्या स्मार्ट आणि स्मार्ट + व्हेरिएंटच्या 2024 च्या MY स्टॉक वर ४० हजार रुपयांची सूट मिळत आहे इतर सर्व ३.३ kW MR व्हेरिअंट वर ५० हजार रुपयांची सूट मिळत आहे. ३.३ kW LR व्हेरिअंटवर ५० हजार रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय ७.२ kw फास्ट चार्जर करणाऱ्या LR च्या सर्व व्हेरिअंटवर ७० हजार रुपयांची सूट मिळत आहे. MY२०२५ साठी, स्मार्ट आणि स्मार्ट + सोडून, टाटा पंच EV च्या सर्व व्हेरिअंटवर ४० हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors january discount tata motors offering up to rs 85000 discount for tata punch ev and tata tiago ev ndj