TATA Motors ही देशातील एका आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन कार्स ज्यामध्ये नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असतात. Auto Expo २०२३ मध्ये सुद्धा टाटा मोटर्सने आपल्या अनेक कार्सचे मॉडेल सादर केले होते. टाटाच्या कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा कंपनी आपल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहेत. तुमच्या आवडत्या वाहनांवर किती डिस्काउंट मिळत आहे हे जाणून घेऊयात.
२०२३ या वर्षात कंपनीने त्यांच्या वाहनांच्या किंमतीवर डिस्काउंट आणि एक्सचेंजचे फायदे दिले आहेत. Tiago आणि Tigor च्या पेट्रोल व्हेरिएंटवर २५,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये ग्राहकांना १५,००० रुपयांचा डिस्काउंट आणि १०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. Tiago आणि Tigor च्या CNG व्हेरिएंटवर एकूण ३०,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना २०,००० रुपयांचा डिस्काउंट आणि १०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे.
DCA वगळता Tata Altroz च्या पेट्रोलमधील सर्व व्हेरिएंटवर २०,००० रुपये डिस्काउंट मिळत असून, यामध्ये १०,००० रुपये डिस्काउंट आणि १०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. DCA ट्रिमवर हा फायदा २५,००० पर्यंत मिळतो. त्यामध्ये १५,००० रुपयांचा डिस्काउंट आणि १०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर समाविष्ट आहे.
Tata Altroz डार्क एडिशनसह XE, XM Plus, XT, XZ आणि XZ प्लस व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. टाटा हॅरिअर आणि सफारी (फेज।) च्या सर्व व्हेरिएंटवर तुम्ही ३५,००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. ज्यामध्ये १५,००० रुपयांचा डिस्काउंट आणि २०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफरचं समावेश आहे. त्यातील नवीन हॅरिअर आणि सफारी (फेज ।।) वर ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही. मात्र यामध्ये २५,००० रुपायांच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश असणार आहे.